
परिवहन महामंडळात आता कर्मचाऱ्यांना बदलीची सुवर्णसंधी
बेळगाव - परिवहन महामंडळाने (Transport Corporation) आंतर निगम बदली प्रक्रिया (Transfer Process) राबविण्यासंबंधीचे आदेश (Order) बजावले आहेत. त्यामुळे एका महामंडळातून दुस-या महामंडळात बदलीसाठी प्रयत्नशील असलेल्या कर्मचाऱ्यांना (Employee) ही सुवर्णसंधी ठरली आहे.
परिवहन महामंडळाने नुकताच याबाबतचा आदेश बजावला असून यात, शुक्रवार १५ एप्रिलपासून १४ मे पर्यंत सामान्य, पती-पत्नी एकाच ठिकाणी बदलीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मागील वर्षी देखील ही भरती प्रक्रिया परिवहन महामंडळाकडून राबविण्यात आली होती.
राज्यात बीएमटीसी, राज्य परिवहन, ईशान्य आणि वायव्य परिवहन महामंडळ असे चार परिवहन महामंडळ आहेत. यापैकी कोणत्याही महामंडळामध्ये परिवहन कर्मचारी बदलीसाठी अर्ज करू शकणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून 'www.ksrtc.org/transfer'' या संकेतस्थळावर बदलीसाठी परिवहन कर्मचारी अर्ज करू शकतात. या संधीचा कर्मचाऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.
Web Title: Golden Opportunity To Transfer Employees In The Transport Corporation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..