esakal | गावी परतलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना खुषखबर ; शिक्षण खात्याच्या या आदेशाचा मिळणार लाभ....
sakal

बोलून बातमी शोधा

good news for 10th student in belgaum

दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याने मोठा दिलासा दिला... 

गावी परतलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना खुषखबर ; शिक्षण खात्याच्या या आदेशाचा मिळणार लाभ....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याने मोठा दिलासा दिला असुन लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आपल्या गावी परतलेल्या विद्यार्थ्यांना  गावाजवळील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे वसतीगृहासह इतर ठिकाणी राहुन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी लॉकडाऊन काळात किती विद्यार्थी आपल्या भागात आले आहेत याची माहिती 25 मे च्या आत गट शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर द्यावी अशी सुचना करण्यात आली आहे. 


कोरोनाच्या संकटामुळे वसतीगृहामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध शहरात राहणारे कामगार आपल्या गावी परतले आहेत. यापैकी ज्यांची मुले दहावीला आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्यातून परीक्षा देण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नजीकच्या परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देण्याची संधी मिळणार असुन वसतिगृह व शहरी भागातून आपल्या गावी गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण खात्याच्या आदेशाचा लाभ मिळणार आहे. 

हेही वाचा-  या शेतकऱ्यांने केली कमी जागेत लागवड पण  बंपर उत्पादन कसे मिळवले वाचा....

गावाजवळील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा ​

शिक्षण खात्याने सोमवारी दहावी परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार 25 जुन ते 4 जुलैपर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी घरी परतले आहेत त्यांना गावाजवळील परीक्षा केंद्रावर परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे तारीख जाहीर झाल्यानंतर पुढे काय याची चिंता लागुन असलेल्या विद्यार्थ्यांची काळजी काही प्रमाणात कमी झाली आहे. 27 मार्चपासुन दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे परीक्षा रद्द करावी लागली त्यानंतरलॉकडाऊन जाहीर झाल्याने अनेक कामगार घरी परतले आहेत तर वसतीगृह आणि वसती शाळांमध्ये क्कारंन्टाईन केंद्र करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थीही घरी परतले आहे. या सर्व विद्यार्थ्यांशी मुख्याध्यापकांना संपर्क साधावा लागणार आहे. 

हेही वाचा-भुदरगडमधील ते दोघे निघाले कोरोना पॉझिटिव्ह... -

मुख्याध्यापकांनी आपल्या गावात किंवा परीक्षा केंद्र परिसरात दहावीचे किती विद्यार्थी घरी आले आहेत याची माहिती 25 मेपर्यंत संकलीत करावी तसेच kseeb.kar.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थी कोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार होते व आता कोणत्या परीक्षा केंद्रावर परीक्षा देणार आहेत याची सविस्तर माहिती द्यावी असे सर्व मुख्याध्यापकांना कळविण्यात आले आहे.

loading image
go to top