गुड न्यूज ःमराठवाडा, विदर्भातील ऊसतोड कामगार परतीच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

घरी जाण्याची ओढ त्यांना लागली होती. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना एकाच जागी थांबण्यास सांगण्यात आले होते. अखेर त्यांना घरी परत पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. कोल्हापूरमधील साखर कारखाना व्यवस्थापनाने साखर कार्यालयाशी, नंतर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडून एसटी प्रशासन असा पत्रव्यवहार केला

नगर : बीड, धुळे, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ आदी 14 ठिकाणांहून कामगार ऊसतोडणीसाठी कोल्हापूरला गेले होते. तेथील कारखान्यांचे गळीत संपल्याने सर्व कामगार गावाकडे परतीच्या मार्गावर असताना अचानक लॉकडाउन जाहीर झाले. त्यामुळे त्यांना प्रशासनाने तेथेच थांबवून धरले होते. गावाकडे परतण्यासाठी कामगारांची धडपड सुरू होती. अखेर एसटी महामंडळाच्या कोल्हापूर आगारातून 50 बसद्वारे 1150 कामगारांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. 
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे सर्व व्यवहारांसह वाहतूक बंद झाली. त्यात बीड, धुळे, भूम, माजलगाव, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बुलडाणा, कारेगव्हाण, पिंपळनेर, पाटोदा, पाथरूड, परळी येथून आलेले ऊसतोड मजूर अडकले होते.

हेही वाचा - मामा किटकनाशक प्यायला, भाच्याने टाकली विहिरी उडी

घरी जाण्याची ओढ त्यांना लागली होती. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना एकाच जागी थांबण्यास सांगण्यात आले होते. अखेर त्यांना घरी परत पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. कोल्हापूरमधील साखर कारखाना व्यवस्थापनाने साखर कार्यालयाशी, नंतर जिल्हाधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडून एसटी प्रशासन असा पत्रव्यवहार केला. त्यामुळे ऊसतोड कामगारांना त्यांच्या गावात सोडण्यासाठी एसटी बस उपलब्ध झाल्या. बीड, यवतमाळ, हिंगोलीसह 14 ठिकाणच्या ऊसतोड कामगारांना 50 बसमधून घरी सोडण्यात आले. प्रत्येक बसमध्ये फक्त 23 जणांना बसविण्यात आले होते. 

ऊसतोड कामगारांना गावी सोडण्यासाठी प्रशासनाने बसची मागणी केली होती. त्यानुसार 50 बस उपलब्ध करून दिल्या. त्यातून सर्व ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावात नेऊन सोडण्यात येत आहे. 
- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, कोल्हापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news Sugarcane workers from Marathwada Vidarbha on their way back