esakal | विजयसिंह मोहिते-पाटलांना एप्रिलमध्ये मिळणार गोड बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

विजयसिंह मोहिते-पाटलांना एप्रिलमध्ये मिळणार गोड बातमी

- भाजपचे खासदार निंबाळकर यांची माढ्यात माहिती
- विजयसिंह मोहिते-पाटील यांची भाजपशी जवळीक
- लोकसभेवेळी रणजितसिंहांचा भाजपत प्रवेश

विजयसिंह मोहिते-पाटलांना एप्रिलमध्ये मिळणार गोड बातमी

sakal_logo
By
अक्षय गुंड

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांना एप्रिलमध्ये भाजप गोड बातमी देणार असल्याची माहिती माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिली आहे.


विजयसिंह मोहिते-पाटील हे लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीपासून अलिप्त असून भाजपशी जवळीक साधत आहेत. अनेक कार्यक्रमांतही ते उपस्थित राहत आहेत. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागला असून माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलले आहे. मोहिते-पाटलांचे जिल्ह्यात असलेल्या राजकीय वर्चस्वाला 2009 पासून राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे शह देण्याचा प्रयत्न केला जात होता. लोकसभेच्या वेळी संधी साधत त्यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीचे नऊ आमदार माझ्या संपर्कात : रणजितसिंह निंबाळकर


तेव्हापासून भाजपकडून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी कधी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण करू तर कधी राज्यपाल तसेच कधी मंत्रिमंडळात समावेशाच्या चर्चा रंगत होत्या. परंतु माढा येथे खासदार निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोहिते-पाटलांना अजून सहा महिने वाट बघावी लागणार आहे, असे दिसते, परंतु पुन्हा एक प्रश्‍न निर्माण झाला असून, त्यांच्यासाठी चांगली बातमी एप्रिल महिन्यातच का? नेमके मोहिते-पाटलांच्या पदरात काय पडणार, एप्रिल फूल तर नाही ना होणार, अशी चर्चा रंगली आहे.

मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, चिंता नको : शरद पवार

उदयनराजेंना मिळणार "हे' मोठे पद
छत्रपती उदयनराजे भोसले यांना लवकरच राज्यसभेवर किंवा राज्यात मोठे पद देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भाजप सकारात्मक असल्याचे माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी माढा येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, शिवसेना व भाजप एकत्रित महायुतीला जनादेश मिळाला आहे. परंतु, काही कलहामुळे जो वाद निर्माण झाला आहे, तो लवकरच संपेल व एकत्रित येऊन महायुतीची सत्ता स्थापन करतील. कारण, उद्धव ठाकरे हुशार असून कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन सरकार किती दिवस टिकेल, हे त्यांना चांगलेच माहीत आहे.

loading image