"मागेल त्याला मोफत रोप' उपक्रमास प्रतिसाद 

solapur
solapur

सोलापूर : इको नेचर क्‍लबच्या मागेल त्याला रोप या उपक्रमास प्रतिसाद मिळत असून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. संस्थाच्या उपक्रमात अनेक तरुण सहभाग घेत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या 13 कोटी वृक्षलागवड मोहिमेतून ही संकल्पना सुचली असल्याचे मनोज देवकर यांनी सांगितले. 

वृक्षसेवा म्हणून संस्थेच्या वतीने देण्यात येत असलेली रोपे लावण्यास खड्डा दाखवण्याची अट संस्थेने घातली आहे. वड, पिंपळ, आवळा, बकुळ, कडूनिंब, चिंच, शेवगा, जांभूळ, सीताफळ, डेल, उंबर, गुगुळ, अशी सावली देणारी आणि औषधी रोपे संस्थेने आतापर्यंत विविध ठिकाणी दिली आहेत. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते कुमठा नाका परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. दत्ता म्हेत्रे, नीलकमल अंकुश, विजयकुमार बायस, संतोष धाकपाडे, आनंद गोसकी, शरणप्पा फुलारी, अश्‍विनी भोसले, गणेश पवार, वर्षा विभूते आदींनी या मोहिमेत सहभाग घेतल्याचे देवकर यांनी सांगितले. 
सोलापूर विद्यापीठ, वसुंधरा कॉलेज, हबिबा बालकाश्रम सोरेगाव, रामलाल चौकातील पालखी मार्ग, भारती विद्यापीठ, उत्कर्षनगर जुळे सोलापूर, आर्किड स्कूल, रोटरी क्‍लब मिडटाऊन, जागृती विद्यामंदिर, बाळे परिसर, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मराठा सेवा संघ आदींना मागणी केल्यानुसार 50 ते 200अशी रोपे देण्यात आली. दिलेल्या रोपांचे लगेच रोपण करण्यात आले, असे त्यांनी सांगितले. 

सोलापूर परिसर हरित करण्याचा संस्थेचा निर्धार आहे. त्यासाठी वृक्षलागवडीची चळवळ वाढणे गरजेचे आहे. रोपांचे जतन व्हावे, यासाठी आम्ही संबंधितांना प्रोत्साहन बक्षीस देणार आहोत. निसर्ग संवर्धनासाठी वृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही. 
- मनोज देवकर, इको नेचर संस्था 

जुळे सोलापुरातील संतोषनगर परिसरासाठी 46 रोपे मनोज देवकर यांच्या इको नेचरकडून मिळाली आहे. आमच्या रिमझिम अपार्टमेंटमधील मुलांचा वाढदिवस आम्ही झाड लावून साजरा करतो. त्यामुळे काही झाडे वाढली आहेत. 
- डॉ. सचिन कुलकर्णी, संतोषनगर जुळे सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com