
सांगली : ‘‘जिल्हा बँकेतील सत्तेच्या माध्यमातून तिचे नेतृत्व करणाऱ्यांनी साखर कारखाने, सूतगिरण्या बंद पाडून त्या विकत घेण्याचा सपाटा लावला आहे,’’ असा गंभीर आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज विधानसभेत लक्षवेधी मांडताना केला. त्यांनी नाव न घेता ‘राष्ट्रवादी’चे नेते जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.