पराभवाच्या भितीने भाजपकडून कार्यकर्त्यांवर हल्ले - पडळकर

पराभवाच्या भितीने भाजपकडून कार्यकर्त्यांवर हल्ले - पडळकर

सांगली - जिल्ह्यातील सुमारे एक हजार बुथवर वंचित बहुजन आघाडीला सत्तर टक्के मतदान झालेले आहे. भाजपला पुढे पराभव दिसत असल्याने त्यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून मारहाण करण्याचा प्रकार सद्या सुरू असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच यापुढे ही प्रवृत्ती सोडली नाही, तर जशास तसे उत्तर आमच्या कार्यकर्त्यांकडून दिले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

पडळकर म्हणाले, लोकसभा निवडणूकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान संपले, त्यानंतर आमचे राजकारण संपवून आम्ही समाजकारणाला लागलो, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीला झालेले मतदान आणि मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद डोळयात खुपू लागला. पराभव पुढे दिसू लागल्यानेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करून मारहाण करणे, घरावर दगडे टाकरण्याचे प्रकार केलेले आहेत.

कवलापूर , इरळी, डोर्ली, आगळगाव आणि तासगाव तालुक्यातील गोटेवाडी येथील आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून दहशात माजविण्याचा प्रकार घडलेला आहे, आम्ही याबाबत पोलीसात गुन्हे दाखल केलेले आहेत. यापुढे असा प्रकार घडल्यास ही प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, जशाच तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

जिल्ह्यातील एक हजार बुथवर वंचित बहुजन आघाडीला सत्तर टक्के मतदान झालेले आहे. त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली असून २३ मे रोजी वंचित बहुजन आघाडी एक लाख मतांच्या फरकाने विजयी झालेली असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

देशमुखांना जातीवाचक भाषा शोभते का ?

भाजपचे मंत्री सुभाष देशमुख आटपाडीला चारा छावणीत तुम्ही ठराविक जातीलाच मतदान केले असल्याचे लोकांना बोलले, लोकांना जातीवाचक बोलणे त्यांना शोभनिय नाही. सरकार भाजपचे असले तरी लोकांसाठी छावणी व इतर सुविधा हा त्यांचा अधिकार आहे. या सुविधा कोणाच्या घरातून दिल्या जात नाहीत. त्यावर सर्वांचा समान अधिकार असल्याचेही श्री. पडळकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com