'जयंत पाटील जागे आहेत का बघत होतो', चुकीच्या इतिसाहावरून टीका होताच पडळकरांची प्रतिक्रिया

Gopichand Padalkar आम्हाला कोणी इतिहास शिकवण्याची गरज नाही असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केलीय. बाचणीत एका कार्यक्रमात चुकीच्या इतिहासावरून त्यांना जयंत पाटलांनी टोला लगावला होता.
Jayant Patil Gopichand Padalkar verbal clash

Jayant Patil Gopichand Padalkar verbal clash

esakal

Updated on: 

बाचणी इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर एका मंचावर आले होते. तेव्हा पडळकर यांची इतिहास सांगताना झालेली चूक दुरुस्त करत जयंत पाटील यांनी टोला लगावला होता. आता यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, जयंत पाटील झोपले आहेत की जागे आहेत ते बघत होतो.

Loading content, please wait...