
जयंत पाटील विरूद्ध गोपीचंद पडळकर
esakal
पडळकरांचे जयंत पाटीलना खुले आव्हान – “वेळ-ठिकाण सांगा, मी हजर होतो” असे आव्हान दसरा मेळाव्यात.
आरक्षणावर ठाम भूमिका – धनगरांना ‘एसटी दाखला’, मराठा-ओबीसी वाद मिटवण्यासाठी स्वतंत्र प्रवर्गाची मागणी.
थेट आरोप आणि इशारा – जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांची लूट केल्याचा आरोप; “माझ्या डोक्यात जाऊ नका, नाहीतर काळीकुट्ट रात्र येईल” असा इशारा.
Gopichand Padalkar Vs Jayant Patil : ‘‘माझ्यावर टीका करणाऱ्यांनी मी कुठे येऊ ते ठिकाण आणि वेळ सांगावी. मी येतो,’’ अशा शब्दांत आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज आमदार जयंत पाटील यांना खुले आव्हान दिले. आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनात आयोजित दसरा मेळाव्यात ते बोलत होते.