

Gopichand Padalkar sangli jilha bank
esakal
Gopichand Padalkar Sangli District Bank : गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. पडळकर यांनी आज (ता.३०) बुधवारी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जयंत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.