मेडिकल कॉलेजसाठी मिळाली जागा!

मेडिकल कॉलेजसाठी मिळाली जागा!

सातारा - गेल्या काही वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या सातारा मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची २५ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. आता सात-बारा उताऱ्यावर सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे नाव लागल्यानंतर कॉलेज उभारणीसाठी ‘डिपीआर’ तयार करण्यात येणार आहे. 

मेडिकल कॉलेजसाठी आघाडी शासनाच्या काळात जागा मंजूर करण्यात आली होती. प्रत्यक्ष जागा हस्तांतरणाची प्रक्रिया मात्र ऑक्‍टोबर २०१८ अखेरपर्यंत झालेली नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातारा दौऱ्यावर दोन वेळा आले होते. त्यावेळी त्यांनी मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होती. त्यासाठी शासन निर्णयही झाला होता. शासन निर्णयानुसार दोन नोव्हेंबर रोजी कृष्णा खोरे विकास महामंडळाची २५ एकर जागा नि:शुल्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. आता या जागेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा नावाचा सात-बारा तयार होण्याची प्रतीक्षा आहे. 

त्यासाठी सातारा तहसीलदार आणि संबंधित मंडलाधिकारी, तलाठी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. एकदा का वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर जागेचा सात-बारा तयार झाला की, पुढची प्रक्रिया तातडीने सुरू होणार आहे. त्यासाठी मेडिकल कॉलेजच्या बांधकामासाठी चंद्रपूर, बारामती, गोंदिया येथील मेडिकल कॉलेजचे नकाशे उपलब्ध करण्यात आले आहेत. साताऱ्यातील जागेसाठी यापैकी कोणता नकाशा मिळताजुळता होईल, हे पाहून त्यानुसार नकाशा व डिपीआर मंजूर केला जाणार आहे. त्यानंतर मेडिकल कौन्सिल या जागेची पाहणी करेल. या कौन्सिलच्या अहवालानंतर मेडिकल कॉलेज उभारणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. 

चंद्रपूर, गोंदिया आणि बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामाचे नकाशे उपलब्ध झालेले आहेत. त्यातील कोणता नकाशा साताऱ्यातील मेडिकल कॉलेजच्या जागेला मिळताजुळता होईल, हे पाहून निर्णय घेतला जाणार आहे.
- डॉ. प्रकाश गुरव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com