गोवर-रुबेलाच्या नोंदी "सरल'वर 

संतोष सिरसट
सोमवार, 10 डिसेंबर 2018

सोलापूर  - शाळेतील विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती "सरल' या संगणकीय प्रणालीवर उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रणालीचा उपयोग करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. राज्यभर नऊ महिने ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना गोबर-रुबेला लसीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याची दैनंदिन माहिती आता "सरल'वर भरण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. 

"गोवर-रुबेला'च्या लसीकरणाची मोहीम शिक्षण विभाग व आरोग्य विभागाच्या वतीने राबविली जात आहे. प्रत्येक शाळेत जाऊन तेथील मुलांना ही लस दिली जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने योग्य ते नियोजन केले आहे. राज्यात 27 नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत जेवढ्या मुलांना ही लस दिली आहे. त्या सगळ्यांच्या नोंदी "सरल'वर करायच्या आहेत. ही सगळी प्रक्रिया बुधवारपर्यंत (ता. 12) पूर्ण करण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाने दिल्या आहेत. याबाबत उद्या (सोमवारी) प्रत्येक गटशिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात केंद्रप्रमुखांची बैठक बोलवायची आहे. त्या बैठकीला तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील. केंद्रप्रमुखांकडून लसीकरण झालेल्या शाळांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. त्याचबरोबर यापुढील शाळांमध्ये लसीकरण झाल्यानंतर त्याच्या नोंदी त्याच दिवशी "सरल'वर करण्याचे आदेशही दिले आहेत. यामध्ये आवश्‍यकता वाटल्यास तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तालुकास्तरावर डाटा एन्ट्री ऑपरेटर उपलब्ध करून द्यायचा आहे. यापुढे ज्या शाळांमध्ये लसीकरण करायचे आहे, त्याचे नियोजन गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करून विद्यार्थ्यांच्या नोंदी "सरल'मध्ये करायच्या आहेत. याचा आढावा बुधवारी (ता. 12) आरोग्य विभागाचे प्रधान सचिव घेणार आहेत. 

अधिकाऱ्यांनी द्यावे वैयक्तिक लक्ष 
या मोहिमेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सक यांची भूमिका महत्त्वाची आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये या दोघांनीही वैयक्तिक लक्ष देण्याच्या सूचना आरोग्य विभागाने त्यांना दिल्या आहेत. 

Web Title: Gover Rubella entry on Saral