आता शेतकऱ्यांच्या उत्पादनात पडणार भर; शासनाचा नवा निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी दिली आहे.

लेंगरे : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींची मर्यादा पाचवरुन वीसपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. कडेगाव खानापूर भागात टेंभुचे पाणी फिरले आहे. मात्र या योजनेतून तलाव, ओढा पात्रात पाणी सोडले जाते. त्यामुळे पाणी साठविण्याची समस्या शेतकऱ्यांना भेडासवत होती.

हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमान प्रकरणी सखल मराठा समाज रस्त्यावर...

शासनाने रोजगार हमीतुन केवळ पाच विहीरीना मंजुर दिली जात होती. यामध्ये गावपुढारी, नेत्यांचे जवळचे कार्यकर्ते यांची वर्णी लागत होती. मात्र विहीरीची संख्या वाढविण्यास मजुंरी दिल्याने सामान्य लोकांची वर्णी लागेल अशी आशा पल्लवित झाल्या आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत एका ग्रामपंचायतमध्ये एका वेळी पाच सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी शासनाकडून घालून देण्यात आलेली होती. भागात टेंभुचे पाणी आल्यामुळे पाणी साठविण्यासाठी शेततळ्याचा वापर केला जात होता.

हेही वाचा - त्यामुळे मुख्यमंत्र्यांची देवावर श्रद्धा कमी...

रोजगार हमीतून देण्यात येणारी संख्या कमी होती. मात्र विहिरींच्या कामांची शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन विहिरी लाभ मिळणार असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती होणार असल्याने निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या सुचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यंत्रणा चांगल्याच कामाला लागल्या आहेत.
 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: government change the decision about irrigation of well and this decision benefits to most of people and farmers also