धनगर आरक्षणाबाबत सरकार उदासीन - सुळे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

जामखेड (नगर) : "भाजपचे सरकार धनगर समाजाला आरक्षण देणार नाही, यांची भूमिका "खोटं बोल, पण रेटून बोल' अशी आहे. केवळ आश्वासने द्यायची आणि जनतेची दिशाभूल करायची भूमिका या सरकारने घेतली, अशी टीका करून हे सरकार आरक्षण देईल असे वाटत नाही, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. 

चौंडी (ता. जामखेड) येथे अहल्यादेवी होळकरांच्या 293 व्या जयंतीनिमित्त खासदार सुप्रिया सुळे येथे आल्या होत्या. या वेळी त्यांनी परिसराची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी चंद्रशेखर घुले, मंजूषा गुंड, ऍड. प्रताप ढाकणे, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, शहाजी राळेभात, शरद भोरे, राजेंद्र कोठारी, शरद शिंदे उपस्थित होते. 

या वेळी खासदार सुळे म्हणाल्या, "धनगर समाजाच्या आरक्षणप्रश्नी आपण संसदेत प्रश्न उपस्थित केला. मात्र, त्या वेळी भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने प्रश्नाला उत्तर देताना, महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला नसल्याचे सांगितले. यावरून सरकारची धनगर आरक्षणासंदर्भात उदासीनता पहायला मिळते.'' 

लोकशाहीची मुस्कटदाबी 
"आरक्षणासंदर्भात आवाज उठविणाऱ्या डॉ. इंद्रकुमार भिसे, सूर्यकांत कांबळे, रवी देशमुख या तिघांना प्रशासनाने जिल्हाबंदीचा "आदेश' काढून लोकशाहीची मुस्कटदाबी करण्याचा केलेला प्रयत्न केविलवाणा ठरला आहे. हे सरकारचे मोठे अपयश आहे,'' अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. 

Web Title: government is not take steps for dhangar community reservations