सहकाराकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन नकारात्मक - राजन पाटील

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 19 जुलै 2018

मोहोळ (सोलापूर) - केंद्र व राज्य सरकारचा सहकाराकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक असुन राजकीय सुडबुद्धीच्या कुटिल कारस्थानानाने सर्वसामान्यांच्या आयुष्याशी निगडीत असणारी सहकार चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजपा युतीचे सरकार करीत आहे. असा घणाघाती आरोप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष राजन पाटील यांनी केला . मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्थेच्या ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे वेळी सभासदांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. कौशिक गायकवाड होते. 

यावेळी सुरवातीस पतसंस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार, लोकनेते कै. बाबुराव आण्णा पाटील व मातोश्री कै.लक्ष्मीबाई बाबुराव पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर मातोश्री कै.लक्ष्मीबाई पाटील तसेच जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी कै.संदीपान दादा गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पुढे बोलताना श्री पाटील म्हणाले आज मितीला बॅकाची अवस्था नाजूक असताना सुरवातीच्या ५० हजारापासुन सुरू झालेली ही पतसंस्था आज सुमारे ९४ कोटी रुपयांच्या ठेवी प्रर्यत गेली आहे. त्यासाठी ठेवीदारांची विश्वासार्हत जपण्याचे काम पतसंस्थेने, त्यांच्या सर्व संचालकानी, कर्मचाऱ्यांनी केल्यामुळेच हे साध्य झाले आहे. यावेळी व्यासपिठावर अध्यक्ष डॉ कौशिक गायकवाड, उपाध्यक्ष प्रमोद डोके, संचालक जग्गनाथ कोल्हाळ, सतीश भोसले, शहाजी गुंड, भास्कर भोसले, सुधीर ननवरे, मोहोन काका डोके, पंडित निकम, चंद्रकांत वाघमोडे, तानाजी रोहीटे,  रंभादेवी गुंड, उपस्थीत होते. व्यवस्थापक नागनाथ टेळे यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. अध्यक्ष डॉ कौशीक गायकवाड यांनी  संस्थेच्या शहरासह अनगर, बेगमपूर, पेनूर, पाटकुल, कुरुल, शिरापूर सो, या ७ शाखेंच्या प्रगतीची व कारभाराची माहीती देत चालू वर्षी संस्थेने दोन कोटी एकवीस लाख पन्नास हजार आठशे चाळीस रुपयाचा नफा मिळविल्याचे सांगितले. यावेळी शाळेत, महाविद्यालयात चांगले यश संपादन केलेल्या संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांचा सत्कार रोख बक्षिसासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

या प्रसंगी हणंमत पोटरे, संतोष भोसले, संजय विभुते, बाळासाहेब राजेंपांढरे, हुमायुन हरणमारे, कामीनीताई चोरमले, यशोदा कांबळे, रशिदा शेख, मुश्ताक शेख, हरिभाऊ कोरे, प्रविण सोनवने, बाळासाहेब शिंगाडे, विश्वनाथ कुलकर्णी, प्रसाद गुरव, भाऊसाहेब गायकवाड, अभिजीत गायकवाड, विक्रम गुंड, महादेव ढोले, आदी सह बहुसंख्य सभासद बांधव उपस्थीत होते.

Web Title: Government's approach to looking at cooperat sector is negative - Rajan Patil