सचिन अंदुरेसह तिघांना उद्या न्यायालयात हजर करणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील संशयित सचिन अंदुरे, अमित बद्दीसह गणेश मिस्किन या तिघांना उद्या (ता. 16) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. मिळालेल्या 10 दिवसात केलेल्या तपासाचा अहवाल तपास यंत्रणेकडून न्यायालयात सादर केला जाईल. 

ज्येष्ठ नेते पानसरे यांची फेब्रुवारी 2015 ला हत्या झाली. कोल्हापूर एसआयटीने याप्रकरणी सहा सप्टेंबरला संशयित सचिन अंदुर, अमित बद्दी, गणेश मिस्किन या तिघांना अटक केली होती. न्यायालयात सरकारपक्षातर्फे तिघा संशयितांच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती. त्यात पानसरे हत्येपूर्वी याप्रकरणातील दुसरा सशयित वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरेसह पाच जणांची कोल्हापुरातील एका खोलीत बैठक झाली होती. त्यात शहरातील एका लेखकासह दोन विचारवंताची रेकी करण्यात आली असल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर मोटारसायकल चोरीतील सहभाग, प्रशिक्षणात वापरण्यात आलेले राऊंड याच्या तपासासाठीही कोठडी मागण्यात आली होती. न्यायालयाने त्या तिघांना 10 दिवसाची कोठडी सुनावली होती. दरम्यान तपास यंत्रणेने अत्यंत गोपनीयरित्या केलेल्या तपासाचा अहवाल तपास यंत्रणेकडून न्यायालयात सादर केला जाण्याची शक्‍यता आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Govind Pansare Murder case follow up