पाचजणांना ताब्यात घेण्याच्या हालचाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येच्या तपासात संशयित सचिन अंदुरे, शरद कळसकर, वैभव राऊतसह पाचजणांना चौकशीसाठी एसआयटीकडून ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सर्वजण डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आहेत. त्याच अनुषंगाने कर्नाटकसह पुण्यात एक पथक दाखल झाले असल्याचे अधिकृत सूत्रांकडून समजते. 

नालासोपारा येथून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) वैभव सुभाष राऊत, शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा सुधीर गोंधळेकरला अटक केली. त्यांच्याकडून २० गावठी बाॅम्बसह इतर साहित्य जप्त केले.

त्यापाठोपाठ पुणे व सोलापूरमधून १० गावठी पिस्तुलांसह शस्त्रसाठा जप्त केला. तशी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येच्या तपासाला गती आली. याप्रकरणी संशयित सचिन प्रकाश अंदुरेला औरंगाबाद येथून तपास यंत्रणेने अटक केली. जालना येथून संशयित माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला ताब्यात घेतले. त्याच वेळी संशयित कळसकरचे कोल्हापुरातील वास्तव्य पुढे आले. 

डॉ. दाभोळकर, पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या एकाच विचाराच्या व्यक्तीने केल्या आहेत. त्याचा मास्टर माइंड एकच असून हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर केला असल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एटीएस, मुंबई आणि कोल्हापूर एसआयटी आणि सीआयडी या चार यंत्रणांमार्फत सुरू आहे. संशयितांकडून जप्त केलेल्या १५ पिस्तुलांपैकी एका पिस्तुलाचा वापर दाभोळकर, लंकेश आणि पानसरे यांच्या हत्येत केला गेला; तर आणखी एका पिस्तुलाचा वापर गौरी लंकेश व पानसरे हत्येत केल्याचा संशय तपास यंत्रणेला आला आहे.

कलबुर्गी यांच्या हत्येसाठी वापरलेल्या शस्त्राची बॅलस्टिक चाचणी फॉरेन्सिक लॅबने केली. त्या अहवालानुसार इतर विचारवंतांच्या हत्येसाठी ते एकच पिस्तूल वापरल्याची चर्चा आहे. 

पानसरे हत्येच्या तपासासाठी संशयित सचिन अंदुरे, वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर आणि श्रीकांत पांगारकर या पाचजणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याच्या हालचाली कोल्हापूर एसआयटीकडून सुरू झाल्या आहेत. याबाबत ताबा मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार पाचजणांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. चौकशीत त्यांच्याकडून पानसरे हत्येसंदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे व पुरावे हाती लागण्याची शक्‍यताही सूत्रांनी वर्तविली. 

कळसकरची माहिती संकलित
संशयित शरद कळसकर टर्नरचे प्रशिक्षण व कामासाठी चार वर्षे कोल्हापुरात होता. तो कोठे राहत होता, त्याच्या संपर्कात कोण कोण मित्र सहकारी आले, याची माहिती तपास यंत्रणेने संकलित केली आहे. ती माहिती सर्व तपास यंत्रणांना देण्यात आल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: Govind Pansare Murder Case Suspected Arrested Crime SIT