शिरढोणला द्राक्ष दलालास आठ दिवस डांबून मारहाण

शिरढोणला द्राक्ष दलालास आठ दिवस डांबून मारहाण

शिरढोण - येथील हॉटेल पंचशीलमध्ये पश्‍चिम बंगाल येथील एका व्यापाऱ्यास दुसऱ्या व्यापाऱ्याने आर्थिक देवाण-घेवाणीवरून आठ दिवस डांबून ठेवले व मारहाण केल्याची घटना उघडकीस आली.

आलमगीर मोहम्मद फारूक हुसेन (वय ३९) रा. इद्राकपूर मुराई, (ता. नंदीगराम) जि. बीरभुम पश्‍चिम बंगाल असे डांबून मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी एम. डी. हुसेन, महंमद बबलू हाजीसलीम दोघेही (रा. बडा बाजार, जुडा सागुर, पश्‍चिम बंगाल(कोलकाता) सध्या रा. शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) यांच्यावर कवठेमहांकाळ पोलिसांत  गुन्हा दाखल झाला आहे. हुसेन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकजण फरारी आहे. ही घटना शुक्रवार  (ता. १) रोजी रात्री उघडकीस आली. 

याबाबत अधिक माहिती अशी, की आलमगीर हुसेन, एम.  डी. हुसेन, महंमद बबलू हाजीसलीम हे सर्वजण फळांचे व्यापारी आहेत. यांतील आलमगीर यांना द्राक्षाचा व्यापार करूया, तू गावी ये असे एम. डी. हुसेन याने फोन करून सांगितले. शिरढोण येथे बोलावून घेतले. शुक्रवार (ता. १५) फेब्रुवारी रोजी हे सर्वजण हॉटेल पंचशील येथे भेटले व तेथेच रूम भाड्याने घेऊन राहिले. यादरम्यान एम. डी. हुसेन याने द्राक्षे खरेदी करून बांग्लादेश येथे पाठविली होती, मात्र तेथे दर कोसळल्याने ती द्राक्षे आलमगीर हुसेन यास सहा लाख रुपयांस एम. डी. हुसेन याने खरेदी करण्यास सांगितले. 

त्याने ही द्राक्षे खरेदी केले. मात्र विक्रीचे पैसे आलमगिर यास वेळेवर मिळाले नाहीत. एम.डी. हुसेन यांस आलमगिर याने पैसे आले नंतर देतो असे सांगितले. मात्र काही केल्यास हुसेन ऐकण्यास तयार नव्हता पेसे दे म्हणून त्या दोघांनी तब्बल आठ दिवस हाँटेल पंचशीलमध्ये डांबून ठेवून केबलने मारहाण केली. पोलिसांनी हॉटेल पंचशीलमध्ये डांबून ठेवलेल्या आलमगिर याची सुटका केली. यातील एम.डी. हुसेन यास ताब्यात घेतले आहे. अधिक तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार पाटील करीत आहेत.

ओळखीच्या लोकांना भेटून तक्रार
शुक्रवारी (ता. १) रात्री नऊ वाजता हुसेन व महंमद हे दोघेजण हॉटेलच्या रूमला बाहेरून लॉक करून निघून गेले. यावेळी आलमगिर याने  पत्नीस फोनवरून संपर्क साधून घडलेली हकिकत सांगितली. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या काही जणांना भेटून कवठेमहांकाळ पोलिसांत तक्रार दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com