esakal | वृक्षतोडीमुळे हरीत बेळगाव धोक्यात; पर्यावरणप्रेमींचा विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

tree cut

वृक्षतोडीमुळे हरीत बेळगाव धोक्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

टिळकवाडी : बेळगाव सुंदर व हरीत बनविण्यासाठी एकीकडे काही सामाजिक संस्था व संघटनांकडून नेहमीच रोप लागवडीचे उपक्रम हाती घेतले जातात. तर दुसरीकडे उपनगरात विविध कारणास्तव वृक्षतोड केली जाणार आहे. तर काही ठिकाणी वृक्षतोड करण्यात आली आहे. यामुळे हरीत बेळगाव धोक्यात आले असून याकडे विविध सामाजिक संस्थांनी तसेच वन विभागाने पुढाकर घेऊन ही वृक्षतोड थांबवावी, अशी मागणी होत आहे.

गरीबांचे महाबळेश्र्वर म्हणून बेळगावची ओळख आहे. घनदाट झाडीमुळे बेळगावची एक वेगळी ओळख आहे. मात्र, स्मार्ट सिटी, महापालिका व इतर संस्थांकडून वृक्षतोड केली जात आहे. बेळगाव शहरात स्मार्ट सिटीतून अनेक ठिकाणची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. यासंबंधी बेळगावकरांनी अनेकवेळा स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊनही त्यांनी याकडे दुर्लक्षच केल्याचा आरोप करण्यात येत आहे. बेळगाव शहरात सध्या नेहरुनगर (केएलईजवळ) व मच्छे भागात जीर्ण झाडे असल्याचे कारण देत ती तोडण्याचा घाट घालण्यात आला आहे. यासाठी सोमवार (ता. ४) पर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. या ठिकाणची ५० पेक्षा अधिक जुनी झाडे तोडली जाणार आहेत. याला पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला आहे.

हेही वाचा: लखीमपूर : शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा रानटी प्रयत्न - शरद पवार

बेळगाव शहराचे फुफ्फुस समजले जाणाऱ्या व्हॅक्सिन डेपोतही गेल्या काही वर्षापासून स्मार्ट सिटीतून कामे केली जात आहेत. यामुळे या ठिकाणी वारंवार वृक्षतोड केली जात आहे. यामुळे व्हॅक्सिन डेपोतील वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. बेळगाव-खानापूर-गोवा या मार्गावरील वृक्षतोड करण्यात आली आहे. तर रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठीही वृक्षतोड होत आहे. हलगा-मच्छे बायपास, रिंगरोड आदीमध्येही वृक्षतोड होणार आहे. यामुळे हरीत बेळगावचे ओळख पुसण्याची भीती निर्माण झाली आहे.

"बेळगावात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. ही वृक्ष तोड थांबली पाहिजे. आपण झाडांचे रक्षण केले पाहिजे. शाळा, महाविद्यालयात याची जागृती केली पाहिजे. यासंबंधी आम्ही वन विभागाकडे तक्रार केली आहे. अनेकांकडून वृक्षतोडीवर आक्षेप नोंदविला असून जास्तीत जास्त वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे."


- वरुण कारखानीस, पर्यावरणप्रेमी

loading image
go to top