सांगलीत मोकाट कुत्र्यांचा धुमाकुळ सुमारे ४ जण जखमी

विजय पाटील
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

सांगली - येथील पंचमुखी मारुती रोडवर आज सकाळी कुत्र्यांनी  धुमाकुळ घातला. २० ते २५ कुत्र्यांच्या टोळीने या रोडवरून जाणाऱ्या अनेकांचा चावा घेतला. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

सांगली - येथील पंचमुखी मारुती रोडवर आज सकाळी कुत्र्यांनी  धुमाकुळ घातला. २० ते २५ कुत्र्यांच्या टोळीने या रोडवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात काहीजण जखमी झाले तर सुमारे चार जणांचा या कुत्र्यांनी चावा घेतला.

संपूर्ण खाणभाग परिसर या घटनेने मोकाट कुत्र्यांच्या दहशतीखाली आहे. महापालिकेने तात्काळ याची दखल घेत कुत्र्यांची धरपकड सुरू केली आहे. 

सकाळी घटलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना रस्त्यावरून फिरणेही मुश्कील झाले आहे. यासाठी महापालिकेने मोकाट मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त तातडीने करण्याची गरज आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने यावर ठोस उपाय योजनेचीही गरज आहे. 

-  उत्तम साखळकर, नगरसेवक 

Web Title: A group of 20 to 25 dogs took bite of many people in Sangli

टॅग्स