अक्कलकोट तालुक्यात खरीप पेरणीच्या कामांना वेग

राजशेखर चौधरी
बुधवार, 4 जुलै 2018

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, शिरवळ आदी भागात यापूर्वीच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या आठवड्यात जेऊर, नागणसुर, तोळणूर, बागेहळ्ळी, दुधनी, सिन्नूर, रुद्देवाडी, मुगळी, अंदेवाडी, शावळ परिसरात तूर, उडीद, मूग व सूर्यफूल पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

अक्कलकोट- अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, शिरवळ आदी भागात यापूर्वीच खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या आठवड्यात जेऊर, नागणसुर, तोळणूर, बागेहळ्ळी, दुधनी, सिन्नूर, रुद्देवाडी, मुगळी, अंदेवाडी, शावळ परिसरात तूर, उडीद, मूग व सूर्यफूल पेरणीच्या कामाला वेग आला आहे.

करजगी, पानमंगरुळ आणि तडवळसह तालुक्यातील 40 टक्के भागात मृग नक्षत्राच्या कमी पावसाने पेरणी अद्याप व्यापक स्वरूपात सुरू होऊ शकले नाही.जून महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसाने नंतरच्या काळात दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी पूरक पाऊस न झाल्यामुळे चिंतातूर झाले होते. जुलै महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे गेल्या दोन तीन दिवसात दुधनी व आजूबाजूच्या परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांनी शेती जून महिन्यातच पेरणी योग्य मशागत करून खत, बी-बियाणे खरेदी करून तयार ठेवले होते. त्यामुळे आता खरिपाच्या पेरणीचे काम जोमात सुरू आहे. तालुक्यात काहीं मंडळात जून महिन्याच्या अखेरीला जोरदार पाऊस झाला होता त्या नंतर जुलै महिन्याच्या सुरुवात पण चांगल्या पावसाने सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे.मागील अनेक वर्षांपासून खरिपाची पेरणीसाठी तालुक्यात सर्वत्र पाऊस पुरेसा आणि वेळेवर होत नाही. यामुळे पेरणीत सतत अडचण उद्भवत असतो.

Web Title: The growth of perni work in Akkalkot taluka