बनावट कागदपत्रांद्वारे जीएसटीची 35 लाखांची फसवणूक I Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

याप्रकरणी गुजरातमधील संशयित ठकसेनाविरुद्ध जत पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला

बनावट कागदपत्रांद्वारे जीएसटीची 35 लाखांची फसवणूक

मिरज : जतमधील (Jat) एका सामान्य व्यक्तीच्या कागदपत्रांद्वारे केंद्रीय जीएसटी (GST) विभागाची तब्बल पस्तीस लाख रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार मिरज (Miraj) येथील केंद्रीय जीएसटी विभागाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी गुजरातमधील (Gujrat) संशयित ठकसेनाविरुद्ध जत पोलिस (Jat police) ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: '2-3 मुलं जन्माला घाला, हिंदुंची लोकसंख्या कमी झाल्यासं भविष्यात मोठं संकट'

याबाबत मिळालेली माहिती अशी गुजरातमधील या संशयित ठकसेनाने जतमधील एस. एन. चौगुले या सामान्य शेतमजुराचे आधारकार्ड, (Aadhar card) पॅनकार्ड (Pan card) तसेच छायाचित्र ऑनलाइन पद्धतीने मिळवले आणि त्याद्वारे केंद्रीय जीएसटी विभागाकडे नोंदणी केली. त्यानंतर या नोंदणी क्रमांकाच्या आधारे दोन कोटी रुपयांचा व्यापार गुजरातमधून केल्याचे दाखवले. यासाठीचे आर्थिक व्यवहार गुजरातमधील एका स्वतःच्या बँक खात्याद्वारे केले आणि त्यासाठीचा परताव्याची तब्बल पस्तीस लाख रुपयांची रक्कम केंद्रीय जीएसटी विभागाकडून मिळवली. जीएसटीच्या तपासणीमध्ये हा प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा: नन बलात्कार प्रकरणातून बिशपची निर्दोष मुक्तता

याबाबत केंद्रीय जीएसटी (GST Department) विभागाच्या अधिकाऱ्यांनी जतमध्ये जाऊन चौगुले या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचे सांगितले. ही व्यक्ती अत्यंत सामान्य आणि शेतमजुरी करणारी आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक तपास केला असता ही सर्व उलढाल गुजरातमधून झाल्याचे आणि यासाठीचे आर्थिक व्यवहारही गुजरातमधील एका बँकेतून झाल्याचे निष्पन्न झाले. केंद्रीय जीएसटी विभागाने तातडीने याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात गुजरातमधील संशयित ठकसेनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या ठकसेनासोबत आणखी काहीजण या फसवणुकीच्या साखळीमध्ये असण्याची शक्यताही पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanglipoliceCrime NewsGST
loading image
go to top