
Sangli : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सहा महिन्यांनंतर अखेर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य निवडीला मुहूर्त लागला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समिती सदस्यांची नावे निश्चित केली असून, ती अंतिम मान्यतेसाठी मंत्रालयात रवाना करण्यात आली आहेत. येत्या दोन दिवसांत त्या नावांना मान्यता मिळण्याची शक्यता असून, त्यात कोणाचा नंबर लागतो, याकडे लक्ष आहे.