

Miraj police seized pistol and koyta after attempted firing on Salim Pathan; one accused detained for investigation.
Sakal
मिरज : दीड महिन्यांपूर्वी शहरात झालेल्या निखिल कलगुटगी खून प्रकरणातील संशयित सलीम पठाण याच्यावर आज दुपारी येथील शासकीय रुग्णालयात गोळीबारासह हल्ल्याचा प्रयत्न झाला. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. वंश वाली असे संशयिताचे नाव आहे. त्याचे अन्य तीन साथीदार रुग्णालयातून पसार झाले. संशयिताकडून पिस्तूल, कोयता जप्त करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांचा फौजफाटा रुग्णालय परिसरात तैनात करण्यात आला.