गुरव समाजाचा मशाल, शिंग- तुतारी मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

सातारा - देवस्थान इनाम वर्ग तीन जमिनी खालसा करून अग्रहक्काने उदरनिर्वाहासाठी गुरवांचे नावे करण्यात यावी, या मागणीसाठी आज सातारा जिल्हा गुरव समाज संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मशाल व शिंग- तुतारी मोर्चा काढला. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर शिंग- तुतारी वाजवून, तसेच घोषणांनी दणादणून सोडला. 

या आंदोलनानंतर गुरव समाजातर्फे जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. शासनाने सर्व इनाम जमिनी खालसा करून इतर सर्व समाजाला न्याय दिला; परंतु गुरव समाजाला न्यायापासून वंचित ठेवले आहे. देवस्थान संदर्भात शासन चुकीचे निर्णय घेऊन गुरव समाजावर अन्याय करीत आहे. शासनाने देवस्थान इनाम वर्ग तीन या जमिनी खालसा करून अग्रहक्काने उदरनिर्वाहासाठी गुरवांचे  नावे कराव्यात, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. 

या वेळी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गुरव, अरविंद पांबरे, शिवाजीराव गुरव, दत्तोबा शिर्के, भालचंद्र गोडबोले, शारदा इंजेकर, सुरक्षा साखरे, संगीता कोकीळ, ज्ञानेश्‍वर गजधरणे, बाबूराव गुरव, मधूकर गुरव, सतीश गुरव, प्रभाकर गुरव, रामचंद्र गुरव, महेंद्र रणवरे, प्रग्नेश इंजेकर, विजय पोरे उपस्थित होते.

Web Title: Gurav community torch, Shing-Tutari Morcha in satara