कर्नाटकातून आलेला 5 लाख 30 हजारांचा गुटखा जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

सोलापूर : विजयपूर रस्त्यालगत जलशुद्धीकरण केंद्र ते सैफुल चौकीदरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात विक्रीस येणारा गुटखा पकडला असून याची अंदाजे किंमत पाच लाख 30 हजार 400 आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास करण्यात आली. 

शासनाने महाराष्ट्रात गुटखा विक्री करण्यास बंदी घातली आहे. शेजारील कर्नाटक राज्यातून शहरात सर्रास गुटखा विक्रीस येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने विजयपूर रस्त्यालगत जलशुद्धीकरण केंद्र ते सैफुल चौकीदरम्यान सापळा लावला होता. दरम्यान, दुपारी सव्वातीनच्या सुमारास रेणुका ट्रान्सपोर्टचा टेम्पो ( केए/49/2750) शहरात आला. पोलिसांनी हा टेम्पो अडवून त्याची तपासणी केली. त्या वेळी आत रजनिगंधा नावाचा तीन लाख 45 हजार 600, रजनिगंधा पाऊच 64 हजार 800, मिराज तंबाखू 45 हजार व नंदिणी स्वीट सुपारी 75 हजार असा सुमारे पाच लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दत्ताप्पा बसण्णा खजुरगी (रा. विजयपूर) यास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांना बोलावून पुढील कारवाईसाठी हा गुटखा त्यांच्या ताब्यात दिला आहे.

Web Title: gutkha of rupees 5 lakh 30 thousand gutkha seized come from Karnataka seized