
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध गुटख्याच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २१ लाखांच्या गुटख्यासह २८ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोन संशयितांना अटक केली आहे. विकास गंगाराम पडळकर (वय २८, रा. इस्लामपूर, जि. सांगली) आणि तेजस विश्वास कांबळे (२३, रा. मिरज, जि. सांगली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.