ऐ भावा... ते अगं बाई... सर्वत्र जीमचे फिव्हर (Video)

सुस्मिता वडतिले
Tuesday, 26 November 2019

- सोलापूर शहरात 150 जीम

- महिलांसाठी 25 स्वतंत्र जीम

- बॉडी बनवण्याची तरुणाईत क्रेझ

- आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न

सोलापूर : ऐ भावा... मित्रा... काय जबरदस्त बॉडी बनवली तू. काय भारी दिसत आहेत तुझे सिक्‍स पॅक... ये हवा... ह्युतिक रोशन, टायगर श्राफ, वरुण धवण यांच्यासारखे सिक्‍स पॅक बनवले आहे. तू जीम कुठे, कधीपासून जॉइन केली आहेस. आम्हालाही सांग ना. मला देखील तुझ्यासारखी बॉडी, सिक्‍स पॅक बनवायचे आहे. अश्‍याच चर्चा युवकांच्या मैफिलीत रंगल्या जात आहेत. त्याचपध्दतीने अगं बाई.... मी किती स्लिम दिसत आहेस. वाह... अजूनही तु कॉलेज गर्ल दिसतीयस बगं... तुझ्या चेहऱ्यावर किती ग्लो आला आहे. इस खुबसूरती का राज हमें भी तो बताओ ना यार... असे काही कॉम्पिलिमेंन्टस युवतींच्या मेळ्यात ऐकायला मिळतात. कारण सोलापूर शहरातील तरूणाईला जणू जीमचा फिव्हरच चढला आहे.

हेही वाचा : फडणवीस सरकारला झटका; उद्याच सिध्द करावे लागणार बहुमत

आरोग्यासाठी थोडासा वेळ
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दक्ष आहे. त्यातूनच रोजच्या धावपळीत थोडासा वेळ स्वत:साठी देण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसह सोलापूर शहरातही जीमचा फिव्हर वाढलेला दिसून येत आहे. शहरात 150 जीम असून त्यात खास 25 महिलांसाठी जीम सुरु आहे. 

हेही वाचा : अजित पवारांनी आता तरी परत यावं : अशोक चव्हाण
हिवाळ्यामुळे जीममध्ये गर्दी

प्रत्येकाचीच दिनचर्या झपाट्याने बदलत चालली आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने जीममध्ये अनेक जणांची गर्दी होत आहे. सहाजीकच यात तरूणांचे प्रमाण मोठे आहे. महिला, मुलीही जीम, योगा करण्याकडे वळल्या आहे. जीम जॉईन करणाऱ्या तरुणाईंची संख्या वाढलेली दिसून येत आहे. फिट नेतृत्व आणि उत्साही राहण्याच्या बाबतीत प्रेरणादायी दिसण्यासाठी जिममध्ये जावून सायकलिंग, जॉंगिग करण्याच्या गोष्टीकडे आवर्जुन पाहिले जात आहे. त्यात ऍरोबिक्‍स, पॉवर योगा, झुंबा, कारडिओ, जिम, स्टीम, वेट लॉस ऍन्ड गेन यातील अनेक प्रकार जो तो आपल्या आवडीने आणि शरीरांच्या दृष्टिने करत आहे. 
-
जीमचे फायदे
- दिवसभर फ्रेश राहतो
- आजारपण कमी होतात
- आजारपणाची फारशी भिती राहत नाही
- मेंदू अधिक सतर्क होतो
- काम करण्याची एनर्जी वाढते
- शारीरिक कार्यक्षमता वाढते
- व्यायाम केल्याने काही संप्रेरके शरीरामुळे कार्य करु लागतात. 
- रोज अर्धा तास स्वत:साठी दिला पाहिजे.

हेही वाचा : कॉंग्रेसच्या गटनेतेपदी बाळासाहेब थोरात ; खर्गेंची घोषणा

फिट राहण्याचा विचार
सध्याच्या बदलत्या जीवनात व्यवस्थित आणि फिट राहण्याचा प्रत्येकजण विचार करत आहे. त्यामुळे पुणे, मुंबईसोबतच सोलापूर शहरातही जीमचे फिव्हर अनेकांमध्ये वाढले आहे. वयाच्या 14 वर्षावरील सर्वजण जीम करु शकतात. त्यामुळे अनेकजण वर्कआऊट करण्यासाठी सज्ज झाले आहे. जीममध्ये हिवाळ्यात ग्राहकांचा प्रतिसाद भरपूर मिळत आहे.
- ओमप्रकाश गोसकी, जीम चालक
-
युवतींचा ओढा
हिवाळ्यामध्ये व्यायाम, योगा, एक्‍ससाइज करण्यासाठी ग्राहकांचा जास्त कल आहे. तरुणांसोबतच युवतींचा ओढा जास्त दिसतोय. म्हणून शहरात जीमचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढतो आहे.
- अमोल लांडगे, जीम चालक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gym fever everywhere