खंडाळ्यातील शेतकऱ्यांचा प्रशासनाविरोधात अर्धनग्न अवस्थेत मोर्चा 

khandala
khandala

खंडाळा (सातारा) - तालुक्यातील औद्योगिकरण टप्पा क्.1, 2 व 3 मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष शासनाशी निवेदन, उपोषण व नंतर बैठकी करुन प्रश्न सोडविण्यासाठी धडपत आहेत. मात्र अद्यापही यांना न्याय मिळाला नाही. शासनाकडुन शेतकऱ्यांची फसवणूक झाली असुन, वेळोवेळी निवेदन देऊन ही न्याय मिळाला नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी तसेच लवकरच न्याय मिळावा यासाठी आज प्रकल्प बाधित तालुक्यातील दहा गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात एकत्र येऊन अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढला. खंडाळा तहसील कार्यालया पासुन मुख्य रस्त्याने पुणे-बंगलुर महामार्गापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत खंडाळाच्या इतिहासात प्रथमच असे अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढण्यात आला. 

यावेळी पंचायत  समिती परिसरातील स्मारक, यशवंतराव चव्हाण व डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यानंतर हे आंदोलन महामार्गावरुन मुबंईकडे रवाना झाले. यानंतर केसुर्डी एमआयडीसीच्या आवारातुन घोषणाबाजी देत, शिरवळ ता.खंडाळा शहरातुन मुख्य बाजारपेठातुन घोषणाबाजी करुन आंदोलन पुढे कार्यरत झाले.

हा मोर्चा आज कापुरहोळ (ता.भोर) येथे या आंदोलनकर्त्यांचा मुक्काम असुन,
 दररोज 25 ते 30 कि.मी.पायी चालणार आहे. यापुढे 
पुणे येथुन मुख्य शहरातुन आयुक्त कार्यालयावर जाणार असुन, पुढे मुबंई ला जाणार आहे. सध्या आई बहिणीच्या लाजापोटी अर्धनग्न अवस्थेत आहोत, मात्र मंत्रालयाजवळ पुर्ण नग्न अवस्थेत घुसणार असल्याचे शेतकरी किसान मंचाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी आंदोलनकर्यांना संबोधतांना स्पष्ट केले.

आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
- केसुर्डी औद्योगिकरण टप्पा क्र.दोन मधील हरकत असणारे १५० एकर क्षेत्र वगळावे
- टप्पा क्र.तीन मधील सात गावातील हरकत असणारे खातेदारांची जमीन वगळण्यात यावी 
- स्थानिक प्रकल्प बाधितांना कंपनी नियमानुसार वर नोकरीसाठी शासकीय आदेश व्हावा
- कृष्णा खोरे विकास महामंडळाने जाहीर केलेला, लाभक्षेत्रातून वगळलेला व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिलेला ना हरकत प्रस्ताव शासनाने  रद्द करावा
- केसुर्डी टप्पा क्र.दोन मध्ये संपादन झालेने उर्वरीत शेतीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा ने  र्यायी रस्ताची व्यवस्था करुन द्यावी
- प्रकल्प गस्तांना उद्योग व व्यवसायात प्राधान्य देण्याबाबतचा शासन निर्णय व्हावा 
- ५० हजार रुपयाचा बेकार भत्ता फसवलेला संपादित खातेदारांना त्वरित द्यावा
- विहीर, पाईप लाईन, झाडे, ताली, घरे यांची नुकसान भरपाई द्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com