‘हॅम्लेट’चे आता बेळगाव, पुण्यात प्रयोग

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

कोल्हापूर - महान नाटककार विल्यम्‌ शेक्‍सपिअर यांची जगप्रसिद्ध शोकांतिका ‘हॅम्लेट’ येथील स्थानिक रंगकर्मींनी व्यावसायिक रंगभूमीवर आणली आहे. काल (रविवारी) कोल्हापूरकरांच्या हाऊसफुल्ल गर्दीत या नाटकाचा पहिला प्रयोग सफाईदार रंगला. 

कोल्हापूर - महान नाटककार विल्यम्‌ शेक्‍सपिअर यांची जगप्रसिद्ध शोकांतिका ‘हॅम्लेट’ येथील स्थानिक रंगकर्मींनी व्यावसायिक रंगभूमीवर आणली आहे. काल (रविवारी) कोल्हापूरकरांच्या हाऊसफुल्ल गर्दीत या नाटकाचा पहिला प्रयोग सफाईदार रंगला. 

दरम्यान, लेखक परशुराम देशपांडे, शेक्‍सपिअरच्या साहित्याचे अभ्यासक डॉ. आनंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पहिला प्रयोग सादर झाला. नाटकाचे प्रयोग आता बेळगाव आणि पुण्यात होणार असून त्यानंतर राज्यभरात दौरे होणार आहेत. जगभरातील अनेक संस्थांनी आजवर हे नाटक रंगमंचावर आणले. या नाटकावर चित्रपटही निघाले. सिग्मन्ड फ्रॉईड यांच्यासारख्या मानसशास्त्रज्ञांनी या नाटकाचा अभ्यास केला. ‘हॅम्लेट’च्या या विशेषतेमुळे अनेक दिग्दर्शक हे नाटक वेगवेगळ्या पद्धतीने हाताळतात. अशा या काहीशा गूढ नाटकाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य ‘याकूब’ व ‘अँतिगॉन’ च्या यशानंतर किरणसिंह चव्हाण यांनी पेलले. 

येथील एम. बी. थिएटरची निर्मिती व परिवर्तन कला फौंडेशन सादरकर्ते आहेत. मंदार भणगे, दिलीप सामंत, प्रिया काळे, स्नेहल बुरसे, महेश भूतकर, सुहास भास्कर, एन डी चौगले, हर्षल सुर्वे, अभिजित कांबळे, संजय पटवर्धन, रोहित जोशी, केदार अथणीकर, हेमंत धनवडे, सागर पिलारे यांच्या भूमिका आहेत. राजेश शिंदे यांचे संगीत आहे. वेशभूषा महेश भूतकर व एन. डी. चौगले यांची आहे. स्नेहल बुरसे व किरणसिंह चव्हाण यांनी नेपथ्य केले आहे तर कला संयोजनाची जबाबदारी संजय पटवर्धन यांनी उचलली आहे.

हॅम्लेटची कथा, शेक्‍सपिअरचे समृद्ध साहित्य महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचावे, हाच या नाटकाच्या निर्मितीचा उद्देश आहे 
- किरणसिंह चव्हाण, दिग्दर्शक

Web Title: hamlet drama belgav & pune