esakal | दिव्यांग म्हणतात, ‘हम भी है जोश में’; ३५ महिलाही गाजवत आहेत मैदान
sakal

बोलून बातमी शोधा

 दिव्यांग खेळाडू

दिव्यांग म्हणतात, ‘हम भी है जोश में’; ३५ महिलाही गाजवत आहेत मैदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - पॅरालिंपिक स्पर्धेत भारतीय खेळाडू पदकांवर छाप उमटवत असताना जिल्ह्यातील सुमारे पावणेदोनशे दिव्यांग खेळाडू ‘हम भी है जोश में’चा नारा देत आहेत. कबड्डी, क्रिकेट, मैदानी खेळात देशपातळीवर चमक दाखवत आहेत. पुढील काही वर्षात सांगलीचा खेळाडू पॅरॉलंपिक स्पर्धेत पदक जिंकावा, अशी मेहनत घेताहेत, मैदानात घाम गाळत आहेत.

हेही वाचा: Raju Shetti Parikrama - पंचगंगेचे लोखंडी कठडे दोराने केले बंदिस्त

जिल्ह्यात दिव्यांग खेळाडूंच्या विकासासाठी पॅरालिंपिक स्पोर्टस् असोसिएशन काम करते. नगरसेवक मंगेश चव्हाण अध्यक्ष, रामदास कोळी उपाध्यक्ष तर विशाल पवार सचिव आहेत. पावणेदोनशे उत्तम खेळाडू असून त्यात ३५ हून अधिक महिला आहेत. कुणी हाताने, कुणी पायाने दिव्यांग आहे. तरी त्यांचा जोश जबरदस्तच. खेळाच्या कीटमध्ये त्यांचा उत्साह अजून वाढतो. नकारात्मकतेवर मात करून ते पुढे जात आहेत.

संदीप सरगर

संदीप सरगर

क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघात भगवान भंडारे, अमोल कोळी, अक्षय यादव, जोतीराम कदम यांची निवड झाली होती. मुंबई एमसीएडीच्या स्पर्धेत मिलिंद कदम, भरत पाटील, अमोल कोळी, पकंज वेदपाठक, मोहालीतील स्पर्धेसाठी विनोद पाटील यांची निवड झाली होती. राज्य महिला क्रिकेट संघात जयश्री शिंदे, दिपाली नाईक, परिक्षिता माळी, स्वाती भस्मे, जरिना मणेर यांनी मैदान गाजवले. कबड्डीत अभिजित पवार, सुरज माळी, सुशांत घाडगे, सुरज गावडे यांची लक्षवेधी कामगिरी आहे. रामदास कोळी आणि अलका आटपाडकर गोळाफेक, थाळीमध्ये पदकांची लयलूट करतात. मैदानी खेळाडू सुरेश सुतार यांच्या पदकांची यादी तर मोठीच आहे. या खेळाडूंना राजू कदम, प्रकाश फाळके, वैभव आंबी आदींचे मार्गदर्शन मिळते.

हेही वाचा: कोल्हापूर - पोलिसांची नजर चुकवत पुरग्रस्ताचा जलसमाधीचा प्रयत्न

संदीप दोन पावले दूर

भालाफेक क्रीडा प्रकारात संदीप सरगर यांची कामगिरी आंतरराष्ट्रीय दर्जाची होत आहे. त्यांनी दुबईतील स्पर्धेत चमक दाखवली. या पॅरालिंपिक स्पर्धेसाठी ते शर्यतीत होते, मात्र संधी मिळाली नाही. पुढील स्पर्धेत ते नक्कीच असतील आणि पदक जिंकतील, असा विश्‍वास त्यांचा खेळ पाहणारे व्यक्त करतात.

चौघांना मिळाली नोकरी

खेळाडूंसाठी राखीव कोट्यातून चार दिव्यांगाना नोकरी मिळाल्याचे रामदास कोळी यांनी सांगितले. विशाल पवार कृषी अधिकारी झाले. शतृघ्न नरळे, अमोल कांबळे, गणेश शिंदे हे तलाठी झाले आहेत.

loading image
go to top