सामान्‍यांच्‍या आवाक्‍यात हापूस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

कोकणाबरोबरच मद्रास आणि कर्नाटकमधून आंबा दाखल

सातारा - कोकणाबरोबरच मद्रास आणि कर्नाटकमधून आंब्यांची आवक वाढल्याने हापूस आता मध्यमवर्गीयांच्या आवाक्‍यात आला आहे.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तामुळे काहीसा दर वाढलेला असला तरी त्यानंतर पुन्हा तो आणखी उतरेल, असा बाजारपेठेतील अडत व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. 

यंदा आंब्याचे पीक चांगले आहे. त्यामुळे आवकही चांगली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणातील आंब्याची आवक वाढली आहे. साताऱ्याच्या छत्रपती शाहू (मार्केट यार्ड) मध्ये ५०० वरून एक हजार पेट्यांपर्यंत वाढ झाली आहे.

पुरवठा वाढल्याने आंब्याचे दर कमी होण्यास मदत झाली आहे. कोकणातील आंब्याबरोबरच मद्रास व कर्नाटकमधील आंबा साताऱ्याच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे. कोकणातील फळाला आंबा शौकिनांची प्रथम पसंती असते. त्यामुळे मद्रास व कर्नाटकचा माल काहीसा स्वस्त असतो. 

मद्रास व कर्नाटकातून साताऱ्यात दोन हजार पेट्या उतरवल्या जायच्या. आवक वाढल्याने पाच हजार पेट्या येत असल्याचे छत्रपती शाहू मार्केटमधील आंबा व्यापारी फारुख बागवान यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ठोक बाजारात कोकण हापूसचा दर प्रतवारीनुसार २५० ते ४५० रुपये डझन तर पायरीचा दर ३०० ते ४०० रुपये प्रति दोन डझन असा आहे. 

‘शुक्रवारी अक्षयतृतीया असल्यामुळे कालपासून आंब्याचा दर ५० ते १०० रुपयांनी वाढला आहे. तथापि, अक्षयतृतीयेनंतर तो पुन्हा उतरेल.’
- फारुख बागवान 

Web Title: hapus mango rate decrease