घाटगे पिता-पुत्रांची जनताच मोडेल दादागिरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

म्हाकवे - व्हन्नाळी गावात कार्यकर्त्यांवर प्रचंड दहशत असूनही स्वाभिमानी निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राक्षसी प्रवृत्तीला विरोध केला आहे. विश्‍वासघात आणि फसवणूक हा एकमेव अजेंडा घेऊन राजकारण करणाऱ्या संजय घाटगे, अंबरिश घाटगे यांची दादागिरी या निवडणुकीत जनता मोडून काढेल, असा विश्‍वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. 
व्हन्नाळी (ता. कागल) येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रकाश वाडकर होते. 

राष्ट्रवादीच्या उमेदवार वृषाली पाटील म्हणाल्या, ‘‘आमच्या कुटुंबीयांनी संजय घाटगेंशी प्रामाणिक राहत त्यांच्या प्रत्येक निवडणुकीसाठी पदरमोड केली. प्रत्येक वेळी घरातला उमेदवार देऊन आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय केला.’’ बाळासाहेब जाधव, पैलवान रवींद्र पाटील, युवराज कुळवमोडे, सूर्यकांत पाटील, योगेश कुळवमोडे, सागर पाटील, जगदीश कांबळे, संजय कांबळे आदी उपस्थित होते. 

Web Title: Hasan Mushrif, MLA