निधी वाटपावरून चंद्रकांतदादांवर मुश्रीफ, सतेज पाटील यांची टिका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

कोल्हापूर - राज्यात कुठेही दलित वस्तीचा निधी भाजपच्या तालुकाध्यक्षा मार्फत दिला जात नाही. मात्र मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अशा पद्धतीने निधी वाटपाचे नियोजन केले आहे. त्यांचा हा निर्णय म्हणजे लोकप्रतिनिधी आणि लोकशाहीची थट्टा आहे. त्यामुळेच लोकप्रतिनिधींच्या अधिकारावर आलेली गदा आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी दिला.

दलित वस्ती निधी वाटपात बदल करावा, अशी मागणी शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्याकडे केली जाणार आहे. जर हा बदल केला नाही तर, जिल्हा परिषदेसमोर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्र पक्षांचे सदस्य उपोषण करतील, असा इशारा आमदार मुश्रीफ यांनी दिला.

महापुरेवर अन्याय का?
विशांत महापुरे हा गरीब कुटुंबातून पुढे आलेला तरुण कार्यकर्ता आहे. मागासवर्गीय समाजाचे तो प्रतिनिधित्व करत आहे. अशा तरुण कार्यकर्त्याला चुकीच्या पद्धतीने बोलणे हे अयोग्य आहे .ही गोष्ट मनाला पटणारी नाही. आमचे सर्व सदस्य महापुरे यांच्या मागे खंबीपणे उभे राहतील, असे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

जंबो शिष्टमंडळ भेटणार
खासदार संजय मंडलिक, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर यांना सतेज पाटील यांनी फोन करून त्यांच्या सदस्यांना शुक्रवारी देण्यात येणाऱ्या निवेदनावेळी उपस्थित राहण्यासाठी सूचना देण्यास सांगण्यात आले. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे हे देखील निवेदन देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hasan Mushrif, Satej Patil comment on Chandrakant Patil