मंडलिकांनी सांगितल्यास सतेज ऐकतील... मुश्रीफ का म्हणाले असे...?

Hasan Mushrif spoke to Madliks on the selection of Guardian Minister of Kolhapur marathi news
Hasan Mushrif spoke to Madliks on the selection of Guardian Minister of Kolhapur marathi news

मुरगूड (कोल्हापूर) - कागलच्या जनतेला मी उपमुख्यमंत्री व्हावे, असे वाटते; पण मी सारखा कागलात राहिलो तर कसा होणार, असा सवाल करत नगरचे पालकमंत्रिपद मला मिळाले आहे; पण गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना खासदार प्रा. संजय मंडलिकांनी मीच जिल्ह्याचा पालकमंत्री व्हावा असे सांगितले तर ते ऐकतील, अशी मिश्‍कील टिप्पणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.

मुश्रीफ यांचे जे शत्रू ते आमचेही शत्रूच

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांचा नागरी सत्कार प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील अध्यक्षस्थानी होते.दरम्यान, मुश्रीफ यांचे जे शत्रू ते आमचेही शत्रूच, त्यांचे मित्र ते आमचेही मित्र असतील, असे सांगून खासदार मंडलिक यांनी जिल्ह्याच्या राजकारणात गोकुळ व जिल्हा बॅंकेच्या निवडणुका तोंडावर असताना नवी राजकीय समीकरणे उदयाला येत असल्याचे संकेत दिले.

महापौर सूरमंजिरी लाटकर, नगराध्यक्ष राजेखान जमादार, उपनगराध्यक्ष धनाजीराव गोधडे, सुहासिनीदेवी पाटील, कागलचे सभापती विश्वासराव कुराडे, उपसभापती दीपक सोनार, जिल्हा बॅंकेचे संचालक भैया माने, सदासाखरचे उपाध्यक्ष बंडोपंत चौगले, ‘बिद्री’चे संचालक गणपतराव फराकटे आदी उपस्थित होते.

पाणीटंचाईप्रश्नी एकत्रित बसून लवकरच तोडगा काढणार

श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘‘साडेचौदा वर्षांच्या मंत्रिपदाच्या यशस्वी कामगिरीमुळे पुन्हा मंत्रिपद मिळाले. त्यामुळे राज्यातील २८ हजार खेडी, दोन लाख ४६ हजार किलोमीटरचे रस्ते अशा विस्तीर्ण प्रदेशाचा विकास करण्याची संधी मिळाली आहे.’’
प्रा. मंडलिक म्हणाले, ‘‘देशातील एकही तलाव खासगी मालकीचा राहिलेला नाही. मुरगूडचा सरपिराजीराव तलाव मात्र खासगी मालकीचा आहे. पाणीटंचाईप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती मागितली आहे. यावर श्री. मुश्रीफ, प्रवीणसिंह पाटील आणि मी एकत्रित बसून लवकरच तोडगा काढणार आहोत.’’
प्रवीणसिंह पाटील, नगराध्यक्ष राजेखान जमादार, डी. डी. चौगले, सुधीर सावर्डेकर यांचीही भाषणे झाली. स्वागत दिग्विजय पाटील यांनी, तर प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत जाधव यांनी केले. आभार रणजित सूर्यवंशी यांनी मानले.

तलावाची किंमत देऊ 

मुरगूडच्या पाणी प्रश्नावर मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘नगरपरिषदेला वेदगंगेतून पाणी उपसा करा, असे समरजितसिंह घाटगे म्हणतात. मग, तुम्हीच तुमच्या शेतीसाठी नदीतून पाणी उपसा करावा. जनतेला पाणी मिळाले पाहिजे, यासाठी त्यांच्या मातोश्रींना भेटण्याची माझी तयारी आहे. मी, खासदार मंडलिक व प्रवीणसिंह पाटील भेटू व त्यांना विनंती करू. तलाव जनतेच्या मालकीचा आहे, अशी मुरगूडकरांची धारणा आहे. तलावाची बाजारभावाने जी किंमत असेल ती मंत्री म्हणून देऊ, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

‘गोकुळ’, ‘केडीसीसी’ची मॅच जिंकू

खासदारकी, आमदारकी आणि आता नामदारकीही जिंकून श्री. मुश्रीफ यांनी वर्ल्डकप जिंकला आहे. गोकुळ व जिल्हा बॅंकेची २०-२० मॅच बाकी आहे. त्यातही खेळून बक्षिसे कागलात आणू, असा विश्‍वास प्रा. मंडलिक यांनी व्यक्त केला.

सतेज पाटील अनुपस्थितीत

मुश्रीफ, सतेज पाटील व खासदार मंडलिक यांची मिरवणूक काढण्याचे नियोजन केले होते. शहरात ठिकठिकाणी नेत्यांच्या प्रतिमांचे फलक, कमानी उभ्या केल्या होत्या; पण या समारंभासाठी सतेज पाटील अनुपस्थित राहिले. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com