छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाचं चित्र पाहिलंय? हे बघा !

छत्रपती संभाजीराजेंच्या राज्याभिषेकाचं चित्र पाहिलंय? हे बघा !

महागाव - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे चित्र पहायला मिळते. परंतु छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाचे चित्र मात्र अद्याप कुठेच प्रकाशित झाले नव्हते. पहिल्यांदा असे चित्र संभाजीराजे यांच्या ३३८ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त प्रकाशित केले.

छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे चित्र साकारणारा युवा चित्रकार प्रमोद कल्लाप्पा मोर्ती हा हरळी खुर्द  (ता. गडहिंग्लज) येथील आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण हिरण्यकेशी विद्यालय हरळी खुर्द येथे झाल्यानंतर कलेची आवड असल्याने कोल्हापूर येथील दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी जी. डी. आर्ट पूर्ण केले. त्यानंतर पुणे येथील ३० ॲनिमेशन डेव्हलपमेंट कंपनीत असोसेट आर्ट लीड या पदावर कामास सुरुवात केली. कंपनीत काम करत असताना अनेक चित्रे रेखाटली.

मोर्ती यांनी ऐतिहासिक चित्र काढण्याची सुरुवात दूर्गमहर्षी प्रमोद मादे यांच्या संपर्कात आल्यानंतर झाली. छ. संभाजीराजे यांच्या राज्याभिषेकाचे चित्र काढण्याअगोदर सरसेनापती संताजी घोरपडे, लखोजीराजे जाधवराव, बाजीप्रभू देशपांडे, सरसेनापती उमाबाईसाहेब खंडेराव दाभाडे यांची ऐतिहासिक चित्रे काढलेली आहेत.

मोर्ती यांनी स्वप्नील कोलते-पाटील, सागर पावटेकर, सिद्धार्थ शेलार, विवेक मोरे, संतोष गायकवाड, रवी पोवार या मित्र परिवारांच्या सहकार्याने आतापर्यंत कोणीही रेखाटले नाही असे संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे चित्र रेखाटण्याचे ठरविले. एक वर्षापासून चित्र काढायला सुरुवात झाली. हे चित्र साकारत असताना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, इंद्रजीत सावंत यांचे मार्गदर्शन घेतले. रायगडच्या बांधकामाची माहिती किल्ले अभ्यासक प्रसाद दांगट यांनी दिली.

अष्टप्रधानची माहिती अमित राणे व रवी मोरे यांच्याकडून घेतली. भगवान चिले व गोपाल चांदूरकर यांचे मार्गदर्शन मिळाले. एक वर्ष कठोर परिश्रम घेतल्यानंतर किल्ले रायकड येथे संभाजी महाराज यांच्या ३३८ व्या राज्याभिषेक सोहळ्यात चित्राचे अनावरण करण्यात आले. 

पहिल्यांदाच असे चित्र समोर 
गेल्या एक वर्षापासून संभाजीराजे यांच्या राज्याभिषेक पेंटिंगचे काम सुरु केले. त्यासाठी अनेक ऐतिहासिक पुरावे व इतर माहिती संकलित केली होती. त्यांचा अभ्यास करुन चित्रकार प्रमोद मोर्ती यांनी त्यांच्या प्रयत्नांतून हे पेंटिंग साकारले आहे. रायगडवर या सोहळ्याचे आयोजन श्री. शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीतर्फे करण्यात आला. या चित्राचे प्रकाशन ३३८ व्या श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा दूर्ग संवर्धन करणाऱ्या एका संस्थेच्या हस्ते करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com