हॉकर्स संघटनेचे पालिकेत ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

कऱ्हाड : पालिकेच्या अतिक्रमण मोहिमेविरुद्ध हॉकर्स संघटनेने आज सकाळपासून पालिकेत ठिय्या आंदोलन केले. पालिकेने काल कृष्णा ते कोल्हापूर नाक्यावरील अतिक्रमण हटवली. त्याला हॉकर्स संघटनेने विरोध केला. त्यावर ठोस पर्याय द्यावा यासाठी आज ठिय्या आंदोलन केले. शुक्रवारी बैठक होईलच मात्र तीन दिवसांच्या व्यवसायाच्या नुकलानीला कोण जबाबदार अशी भुमिका घेत ठिय्या आंदोलन केले. 

पालिकेने केवळ बघ्याची भूमिका न घेता त्यावर ठोस पर्याय द्यावा अशी मागऩी संघटनेने केली. पालिका आवारात साडेअकराच्या सुमारास मुख्याधिकारी आले. व गेले वास्तविक हॉकर्स संघटना चर्चा करण्यासाठी आली होती. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्य अशा वागण्यामुळे आम्ही निर्णय होत नाही, तोपर्यंत दररोज पालिकेत येऊन ठिय्या मारणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले. जावेद नायकवडी, प्रमोद तोडकर, प्रकाश जाधव यांच्यासह महिलाही सहभागी होत्या.

Web Title: Hawker's organization protest in corporation