esakal | धक्कादायक - पैशासाठी संस्थाचालकाकडून मुख्याध्यापकास मारहाण 
sakal

बोलून बातमी शोधा

Head of the Institute Beating by teacher in kagal kolhapur

धक्कादायक - पैशासाठी संस्थाचालकाकडून मुख्याध्यापकास मारहाण 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कागल (कोल्हापूर) : शिक्षकांनी पगार परस्पर बॅंकेतून काढल्याचा राग मनात धरुन संस्थेचे सचिव व त्याच्या मुलांनी हायस्कूलच्या मुख्याध्यापकास मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशी फिर्याद बेलवळे खुर्द ( ता. कागल) येथील न्यु हायस्कुलचे मुख्याध्यापक संतोष राजाराम पाटील (रा. बेलवळे बुद्रुक) यांनी कागल पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी संस्थेचे सचिव दिनकर श्रीपती कोतेकर, अभिजीत दिनकर कोतेकर, अमोल दिनकर कोतेकर (सर्व रा. बेलवळे खुर्द ता.कागल) यांच्याविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना दिनकर कोतेकर यांच्या घरासमोर घडली. 

हे पण वाचा -  चालीवरून लागला पोलिस ठाण्यातील चोरीचा छडा 

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, संतोष पाटील हे न्यु हायस्कूल (बेलवळे खुर्द) या शाळेचे मुख्याध्यापक आहेत. शाळेच्या संस्थेचे सचिव दिनकर कोतेकर यांनी त्यांना घरी बोलवले होते. शाळेचे शिपाई व सहाय्यक शिक्षक यांच्यासह संतोष पाटील हे कोतेकर यांच्या घरासमोर गेले. यावेळी 'शिक्षकांनी दोन दोन पगार आम्हाला न देता परस्पर बॅंकेतून काढले आहेत' असे म्हणत, त्याचा राग मनात धरुन दिनकर कोतेकर, अभिजित कोतेकर व अमोल कोतेकर यांनी थांबवून ठेवत, शिवीगाळ करुन लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. "तुला जिवंत ठेवत नाही, तुला ठार मारतो' अशी धमकी दिल्याचे संतोष पाटील यांनी फिर्यादित म्हटले आहे. 

हे पण वाचा - सिम कार्ड बदलले आणि अडकला पोलिसांच्या जाळ्यात 

loading image