हातकणंगले येथील आश्रमशाळेच्या मुख्याद्यापकाची आत्महत्या

अतुल मंडपे
शनिवार, 12 जानेवारी 2019

हातकणंगले - येथील अण्णासाहेब डांगे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक भास्कर मारुती यादव (वय 52) यांनी आज सकाळी आठच्या सुमारास नरंदे येथील खिंडीमध्ये दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाहीं मात्र त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली असून या घटनेने शैक्षणिक क्षेत्रांत प्रचंड खळबळ उडाली आहे. भास्कर यादव हे येथील अण्णासाहेब डांगे आश्रम शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम पहात होते.  ते पत्नी व दोन मुलांसह वडगाव येथे रहात होते. विवाहित असूनही त्यांनी काही वर्षापूर्वी त्याच शाळेतील साविता पाटील या शिक्षिकेशी दुसरा विवाह केला होता. त्यावरून कौटुबिक वाद सुरू होता. दुसऱ्या पत्नीने त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावला होता, ती  वारंवार त्यांना ब्लँक मेल करत होती.

महिन्यांपूर्वी तिने महिला दक्षता समितीकडे तक्रार केली होती. करवीर पोलीस ठाण्यांत याबाबतचा गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी त्यांना आज जबाबासाठी बोलावले होते. पण अटक झाली तर नोकरी जाण्याची भिती त्यांना सतावत होती.

आज सकाळी त्यांनी नरंदे येथे आपला अपघात झाल्याचे आपल्या सहकारी शिक्षकांना सांगून बोलावून घेतले. सहकारी शिक्षक घटनास्थळी गेले असता त्यांनी आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. शिक्षकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांना यादव यांच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडल्याचे  सांगितले. मात्र त्याचा तपशील अद्याप समजलेला नाही. घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Head Master of Hatkanagale Ashram School has committed suicide

टॅग्स