
Mother Daughter Drown Sangli : बेळोंडगी (ता. जत) येथे घराजवळ खेळताना शेततळ्यात दोन वर्षांची चिमुकली पडली. तिला वाचविण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. मात्र, तिलाही पोहता येत नसल्याने दोघींचा बुडून मृत्यू झाला. कावेरी आनंद संबर्गी (वय २०) व लक्ष्मी आनंद संबर्गी (२ वर्षे) असे मृत मायलेकींचे नाव आहे. बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.