

waterlogging Miraj
sakal
मिरज : शहरात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे अडचणी निर्माण होत आहेत. बुधवारी रात्रीच्या सुमारास अचानक सुरू झालेले वादळी वारे आणि मुसळधार पावसाने शहरवासीयांची दैना उडाली. यात सांगली रस्त्यावर झाड पडल्याने, तर ईदगाह परिसरातही घरावर झाड पडल्याने नुकसान झाले. दरम्यान, तारांवर झाडे पडल्याने मिरज शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा रात्रभर बंदच राहिला, तर अनेक भागांत आज दुपारपर्यंतही वीज आलेली नव्हती.