esakal | इचलकरंजी: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला

इचलकरंजी: हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला

sakal_logo
By
ऋषीकेश राऊत

इचलकरंजी: सततच्या पावसाने काढणीच्या अवस्थेतील सोयाबीनला फटका बसत आहे. शेंगांना झाडावरच कोंब फुटण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. आधीच शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेला सोयाबीनचा घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही दिवस पाऊस असाच पडला तर सोयाबिन उत्पादन मोठ्या प्रमाणात घटण्याची धास्ती उत्पादकांना आहे.

हेही वाचा: प्रेम प्रकरणातून सातवेतील तरुणाचा खून;पाहा व्हिडिओ

संकटांची मालिका शेतकऱ्यांची पाठ सोडताना दिसत नाही. महापुरात उद्ध्वस्त झालेले शेतकरी सध्या सावरत आहेत. उरल्यासुरल्या शाबूत पिकातून उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना आहे. हातकणंगले तालुक्यातील प्रमुख नगदी पीक असणारे सोयाबीन आता पडणाऱ्या पावसाने धोक्यात आले आहे. सोयाबीन काढणीला आले असताना पावसाच्या संकटाने उत्पादक भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे पाऊस थांबला नाही तर सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याची शक्यता दाट आहे.

पाऊस मळणीसाठी घातक

सोयाबीन परिपक्व झाल्याने काढणीसाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे.पण यामध्ये पावसाचा व्यत्यय येत आहे.अशा परिस्थितीत मळणी सोयाबीनला घातक ठरणारी आहे.पावसामुळे मळणीनंतर पुढच्या प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हाताबाहेर आहेत. त्यामुळे पाऊस थांबण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

हेही वाचा: 'नेमिष्टे गॅंग 'कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार

कीड, तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव

ऑगष्ट महिन्यात काही ठिकाणी सोयाबीन पिकावर कीड व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली होती. या वर्षी एकाच हंगामात नियमित कीडरोगासह महापूर,अवकाळी ही तीन नवी संकटे सोयाबीन पिकावर आल्याने शेतकरी धास्तावला आहे. सततचे दमट वातावरण, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव, वातावरणातील बदल यामुळे यावर्षी ऐन काढणीला असलेल्या सोयाबीन पिकावर पावसाने अस्मानी संकट ओढवले आहे.

सोयाबीनचा दर धोक्यात

यंदा दहा वर्षात प्रथमच सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला आहे.मात्र पडणाऱ्या पावसामुळे उत्पादनाबरोबर सोयाबीनचा दरही चांगलाच खालावण्याची चिन्हे आहेत.10 आद्रतेच्या वर टनाला 8 हजारापर्यंत दर आहे.सध्याच्या स्थितीत सोयाबीनची मळणी केली तर वाळवण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त धडपडावे लागणार आहे. आताच्या वातावरणात 20 ते 25 आद्रतेचे प्रणाम टिकून राहते. याला दर टनाला 5 हजारापर्यंत बाजारात आहे.

केडी 726,753 तारणार

तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे 50 टक्के क्षेत्रात शेतकऱ्यांनी केडी 726,753 या प्रजातीच्या सोयाबीनचा पेरा घेतला आहे. यांचा कालावधी जास्त असून सध्या हे पीक शेंगा भरणीच्या अवस्थेत आहे. सप्टेंबरच्या शेवटी अथवा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही पिके काढणीला येतात.त्यावेळी पावसाचा परिणाम होत नसल्याने हे सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना तारणार आहे.

हातकणंगले तालुका सोयाबीन पीक

पेरणी - 10 हजार 867 हेक्टर

महापुर, अतिवृष्टी नुकसान - 1 हजार 200 हेक्टर

जीवित पीक - 9 हजार 667 हेक्टर

loading image
go to top