नेवासे तालुक्यात सर्वदूर पाऊस

सुनील गर्जे
सोमवार, 16 जुलै 2018

गेल्या दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने आज दुपारी नेवासे शहरासह तालुक्यात 'कमबॅक' केले. पावसाने तालुक्यात पश्चिम भागात जोरदार तर उत्तर, दक्षिण व पूर्व भागात कमी-अधिक हजेरी लावली. रात्री उशिरापर्येंत तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरूच होता. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर तालुक्यात कुठेच सुर्यदर्शन घडले नाही. दरम्यान नेवाशात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने काही रस्ते पाण्याने तुंबले तर काही चिखलमय झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.
 

नेवासे : गेल्या दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने आज दुपारी नेवासे शहरासह तालुक्यात 'कमबॅक' केले. पावसाने तालुक्यात पश्चिम भागात जोरदार तर उत्तर, दक्षिण व पूर्व भागात कमी-अधिक हजेरी लावली. रात्री उशिरापर्येंत तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस सुरूच होता. सकाळ पासूनच ढगाळ वातावरण असल्याने दिवसभर तालुक्यात कुठेच सुर्यदर्शन घडले नाही. दरम्यान नेवाशात झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाने काही रस्ते पाण्याने तुंबले तर काही चिखलमय झाले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती.

रविवार दुपारपासूनच तालुक्यात सर्वदूर ढगाळ वातावरण होते. मात्र नेवासे बुद्रुक, साईनाथ नगर, बहिरवाडी, बेलपिंपळगाव, जैनपूर, घोगरगाव या भागापासून दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊसाची सुरुवात झाली. तर नेवासे शहर परिसर, पाचेगाव, पानेगाव, पुनतगाव, चांदे, घोडेगाव, सोनई याभागात मध्यम स्वरूपाचा तर कुकाणे, तरवडी, जेऊर हैबती, देडगाव, तेलकुडगाव, शिरजगाव, गेवराई, वरखेड या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान दुपारी तीन वाजल्यापासून तालुक्यात सर्वदूर संततधार पाऊस चालूच होता. दरम्यान पावसाने तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे तालुका प्रशासनाने सांगितले.  

प्रवरा, मुळा, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
भारतीय हवामान खात्याने 16 ते 18 जुलै दरम्यान मध्यमहाराष्ट्रात अतिवृष्टी होण्याचा इशारा दिल्याने नेवाशाचे तहसीलदार उमेश पाटील यांनी नाशिक व पुणे जिल्ह्यात पावसामुळे वा धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने नेवासे तालुक्यातील प्रवरा, मुळा, गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: heavy raining in newasa taluka