मिरज : शिरोळ, कागवाड, ढवळी रस्ते पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

कृष्णाघाटावर नदीचीपातळी आज सकाळी 60 फुटांवर पोहोचली. तेथील कृष्णेश्वर मंदिरात रात्रीच पाणी शिरले. आज सकाळपासून शिरोळकडे जाणाऱ्या पुलावर पाणी भरु लागले. दुपारपर्यंत पुलावर सुमारे दोन फुट पाणी वाहत होते. रात्रीपर्यंत दिसणारा पुल सकाळी दिसेनासा झाला. पोलिस, महापालिका व महसूल प्रशासनाने मिरज व शिरोळ शहरांदरम्यानची वाहतूक काल दुपारी दोनपासूनच बंद केली

मिरज - कृष्णेच्या महापुरामुळे तालुक्यातील काही रस्ते पाण्याखाली गेले. कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारी वाहतूक बंद झाली. 

कृष्णाघाटावर नदीचीपातळी आज सकाळी 60 फुटांवर पोहोचली. तेथील कृष्णेश्वर मंदिरात रात्रीच पाणी शिरले. आज सकाळपासून शिरोळकडे जाणाऱ्या पुलावर पाणी भरु लागले. दुपारपर्यंत पुलावर सुमारे दोन फुट पाणी वाहत होते. रात्रीपर्यंत दिसणारा पुल सकाळी दिसेनासा झाला. पोलिस, महापालिका व महसूल प्रशासनाने मिरज व शिरोळ शहरांदरम्यानची वाहतूक काल दुपारी दोनपासूनच बंद केली, त्यामुळे मिरजेतून नृसिंहवाडी, शिरोळ व कुरुंदवाडची वाहतूक पुर्णतः ठप्प राहीली. 

म्हैसाळ येथे कृष्णेचे पाणी राज्यमार्गावर पसरले. कागवाडकडे जाणार्या रस्त्यावर काल संध्याकाळी फुटभर पाणी होते. त्यातूनच वाहने धावत होती. रात्रीपासून पाण्याचा प्रवाह वाढू लागला. आज दुपारी बारा वाजता या रस्त्यावर सुमारे चार ते पाच फूट पाणी वाहत होते. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकदरम्यानची वाहतूक बंद राहीली.

परिवहन मंडळांच्या बसेस बेडगमार्गे सोडण्यात येत होत्या. मिरज-कागवाड रस्त्यावरुन होणारी आंतरराज्य वाहतूकही थंडावली. सुदैवाने रेल्वे वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. कर्नाटकात जाणार्या रेल्वेंना तोबा गर्दी होत आहे. म्हैसाळ ते कनवाड हा कृष्णा नदीवरच्या बंधार्यावरुन जाणारा रस्ता पंधरवड्यापासून पाण्याखाली आहे. ढवळी ते म्हैसाळ आणि मिरज ते ढवळी हे रस्ते दोन दिवसांपासून बंद आहेत. ढवळी गावाला तीनही बाजूंनी पाण्याने वेढले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains flood situation in Sangli