महामार्गांवर सक्‍ती असूनही हेल्मेट दिसेना 

तात्या लांडगे
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सोलापूर : केंद्र सरकारने मागील तीन-चार वर्षांपूर्वी राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्‍ती केली. परंतु, त्याची अंमलबजावणी होत नाही. दुचाकीस्वारांकडून हेल्मेटचा वापरही केला जात नाही. त्यामुळे अपघात कमी होण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. 

राज्यातील रस्त्यांवर अपघातात दररोज सरासरी 37 जणांचा मृत्यू होत असतानाच ब्लॅक स्टॉप (अपघातप्रवण)ची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षात राज्यात 742 ब्लॅक स्पॉट होते तर यावर्षी त्यात 533 स्पॉटची भर पडली आहे. सद्यस्थितीत राज्यात एक हजार 275 ब्लॅक स्पॉट असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील 45 ठिकाणांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक 101 ब्लॅक स्पॉट असून अकोला जिल्ह्यात एकही ठिकाण नाही. राज्यात दररोज रस्त्यांवर ये-जा करणाऱ्या वाहनांत दुचाकींचे मोठे प्रमाण आहे.

पावसाळ्यात अपघांचे प्रमाण अधिक असते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अपघाताचे प्रमाण पुन्हा वाढले असून त्यात सर्वाधिक दुचाकीस्वारांचा समावेश आहे. मागील तीन वर्षांत रस्ते अपघातात सुमारे 38 हजार जणांचा मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिस, शासकीय रुग्णालयासह अन्य ठिकाणी झाली आहे. त्याचे प्रमुख कारण विनाहेल्मेट दुचाकी चालविणे हेच असल्याचे निष्पन्न झाले आहे. 

राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरणे सक्‍तीचे आहे. त्याबाबत सातत्याने कारवाया केल्या जातात. परंतु, कारवायांपेक्षा स्वत:हून जागृत होण्याची गरजचे आहे. जेणेकरून अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होईल. 
- अशोक पवार, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Web Title: helmet is mandetari on highway