केरळ आपत्तीग्रस्तांना वाडी वस्तीवरील शाळेकडून मदत

हुकूम मुलाणी
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - केरळमध्ये निसर्गाच्या अवकृपेने झालेली वाताहात, आपत्तीग्रस्तांना पुन्हा सावरण्यासाठी मदतीचा हात देण्यात दै.सकाळ नेहमी अग्रेसर असते. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून स्वताचे दहा लाख जमा करून समाजातील दानशूर व्यक्तीला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत दुष्काळी तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांभारवस्ती येथील दोन शिक्षकी शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून जमा केलेली रक्कम सकाळ रिलीफ फंडाकडे जमा केली.

या शाळेत ग्रामपंचायतीने 14 व्या वित्त आयोगातून बसविण्यात आलेल्या दुरचित्रवाणी संचाच्या माध्यमातून शैक्षणिक माहितीबरोबर देश व जागतिक पातळीवरील घडोमोडी दाखवल्या जातात यामध्ये केरळमधीलमध्ये घडलेल्या आपत्तीने विद्यार्थी देखील भावूक झाले. त्यातून अन्य ठिकाणावरून होत असलेली मदत पाहता येथील विद्यार्थीनी आपण यात खारीचा वाटा उचलावा म्हणून मुख्याध्यापक वामन माने व सहशिक्षण नवनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी ही मदत गोळा केली. यामध्ये रू एक हजार जमा झाले. सकाळच्या आवाहनास तालुक्यातील पहिली वाडी वस्तीवरील शाळा ठरली आपत्ती ग्रस्ताला मदत देवून मानुसकीची भावना दाखवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे ग्रामस्थामधून कौतुक होत आहे.

Web Title: Help from Kerala school children affected by the school