डॉ. हमीद दाभोलकरांनी 'या' साठी घेतलाय पुढाकार

डॉ. हमीद दाभोलकरांनी 'या' साठी घेतलाय पुढाकार

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर घाबरलेल्या लोकांना भावनिक प्रथमोपचार मिळावेत, यासाठी येथील परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मोफत मनोबल हेल्पलाइन नावाचा उपक्रम सुरू केला आहे.
 
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले,""कोरोनामुळे सर्व समाज धास्तावलेला आहे. जगभरातून येणाऱ्या बातम्या आपल्यावर आदळत आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडेही विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्‍यता आहे. याचे आपल्यावर शारीरिक परिणाम तर होत आहेतच. पण, मानसिक तणावातूनही आपण जात आहोत. समाजातील काहीजण कुटुंबापासून लांब आहेत. अशा वेळी कोणाशी प्रत्यक्ष भेटता न येणे हेही ताणाचे कारण असू शकते.

कोरोनाबद्दल खूप उलटसुलट माहिती समाजमाध्यमामधून पसरते आहे. त्यामुळे आपल्याला नेमका कशाने संसर्ग होऊ शकतो आणि काय केल्याने त्यापासून सुरक्षित राहू, असे विचारही त्रास देवू शकतात. अशा लोकांना भावनिक प्रथमोपचार मिळावेत, यासाठी मनोबल हेल्पलाइन नावाचा उपक्रम सुरू केला आहे. वीसपेक्षा अधिक तज्ज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणी यांच्या माध्यमातून मनोबल हेल्पलाइन चालवली जाणार आहे.'' कोरोनामुळे ज्यांना अस्वस्थता, भीती, निराशा वाटत असेल, अशा लोकांना समजून भावनिक आधार देणे समुपदेशन मनोबल हेल्पलाइनच्या माध्यमातून दिले जाणार आहे. ज्यांना मन मोकळे करण्याची, आधाराची गरज वाटली तर खालील नंबरवर फोन करावा, असे आवाहन डॉ. दाभोलकर यांनी केले आहे. 

Lockdown : पाेलिस तपास सुरु; हजाराे दारुच्या बाटल्या चाेरीस

मराठी आणि हिंदी भाषेतून ही सेवा पुरवली जाईल. राज्यातील आणि राज्याबाहेरील लोकांना केवळ एक फोन करून ही सुविधा मिळू शकते. ही सेवा मोफत असून, यासाठी कोणतेही शुल्क नाही. आपली माहिती पूर्ण गोपनीय राहील.
 
आजूबाजूच्या व्यक्तींना भावनिक आधार कसा द्यावा, या विषयीचे "चला भावनिक प्रथमोपचार द्यायला शिकूया' हे ऑनलाइन प्रशिक्षणही परिवर्तन संस्थेतर्फे मोफत आयोजित केले आहे. त्यासाठी रेश्‍मा कचरे 9561911320, योगिनी मगर 9665850769 येथे संपर्क साधावा. 

मनोबल हेल्पलाइनसाठी करा संपर्क 

सुनीता भोसले 9552459553, राणी बाबर-9923095901, योगिनी मगर 9665850769, रूपाली भोसले 8149278509, मोरेश्वर देशमुख 9860414603, नंदिनी जाधव 9422305929, कृतार्थ शेवगावकर 9823974400, राजू इनामदार 9822917580, नितीन लेले 9284914172 आदींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com