पोलिसांसाठी सुरू झाली समाधान हेल्प लाइन!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची संकल्पना; "टी विथ सीपी'नंतर नवा उपक्रम

सोलापूर - पोलिस दल.. ऑन ड्यूटी चोवीस तास दक्ष राहण्याची शासकीय नोकरी. वर्दीतल्या पोलिसांना समाजात मान मिळत असला तरी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. लोकांच्या समस्या सहज सोडविणाऱ्या पोलिसांच्या वैयक्तिक अडचणी मात्र सुटत नाहीत. यावर मार्ग काढण्यासाठी पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी समाधान हेल्पलाइन सुरू केली आहे.

शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासोबतच पोलिस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी पोलिस आयुक्त सेनगावकर यांनी विविध उपक्रम सुरू केले आहेत. मे 2015 पासून पोलिस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी हॅलो कमिशनर हा उपक्रम सुरू आहे. गेल्या महिन्यापासून टी विथ सीपी हा आगळावेगळा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यापासून समाधान हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. पोलिसांना आपल्या अडचणीसाठी नियंत्रण कक्षातील 0217-2318888 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. पूर्वी दिलेल्या तक्रारीचे काय झाले हेही विचारता येणार आहे.

नियंत्रण कक्षातील समाधान हेल्पलाईनच्या क्रमांकावर पोलिस कर्मचारी आपल्या अडचणी सांगू शकतील. त्यांची तक्रार नोंद करून ती पुढे योग्य कार्यवाहीसाठी जाईल. हॅलो कमिशनर आणि टी विथ सीपी या उपक्रमासोबत समाधान हेल्पलाइन सुरू केल्याने नक्कीच पोलिसांच्या अडचणी सुटल्यास मदत होईल.

- रवींद्र सेनगावकर, पोलिस आयुक्त

Web Title: Helpline started for Police