...अखेर तिचा मृतदेह सापडला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

नातेवाईकांच्या गावातून घरी परतताना मोरेवाडी (ता. पाटण) येथून वांग नदीतून वाहून गेलेल्या सणबुर (ता. पाटण) येथील शाळकरी मुलीचा मृतदेह आज सकाळी ढेबेवाडीजवळच्या पुलानजीक नदीपात्रात सापडला.

ढेबेवाडी (जि. सातारा) : नातेवाईकांच्या गावातून घरी परतताना मोरेवाडी (ता. पाटण) येथून वांग नदीतून वाहून गेलेल्या सणबुर (ता. पाटण) येथील शाळकरी मुलीचा मृतदेह आज सकाळी ढेबेवाडीजवळच्या पुलानजीक नदीपात्रात सापडला.

दरम्यान, गुरुवारी (ता. १२) सकाळी सव्वाआठ वाजता ही घटना घडल्यापासून पोलिस व महसूल प्रशासनासह ग्रामस्थ मृतदेहाचा शोध घेत होते. दरम्यान मराठवाडी धरणातून पूर्वसूचना न देता नदीपात्रात पाणी सोडल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप सणबुर ग्रामस्थांनी केला असून, जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सणबुर येथील शंकर रामचंद्र साठे (वय ७३) हे गुरुवारी सकाळी आपल्या तीन चिमुकल्या नाती सोबत वांगनदीचे पात्र ओलांडत असताना चौघेही पाण्याच्या लोटाबरोबर वाहून गेले होते. त्यातील तिघांना स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून वाचवले परंतु क्षितिजा शिवाजी साठे (वय १२) हिला वाचविण्यात त्यांना यश आले नव्हते. चार दिवसांपासून प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहाय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस, ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्यांच्या मदतीने क्षितिजाचा नदीपात्रात शोध सुरू होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Her body was eventually found