हेरंब कुलकर्णी यांना 'साहित्यसेवा' पुरस्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जुलै 2019

कुलकर्णी यांनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना शिक्षण व वंचिताच्या बाजूने विपुल लिखाण केले आहे. दुर्गम भागात भेट दिलेल्या दोनशे शाळांच्या अनुभवावर "शाळा आहे शिक्षण नाही' हे पुस्तक व परीक्षेत नापास झाल्यामुळे होत असलेल्या आत्महत्या या विषयावर देशातील तज्ज्ञ प्रयोगशील शाळा यांचे एकत्रित विचारमंथन असलेले "परीक्षेला पर्याय काय?' हे पुस्तक संपादन केले आहे. केंद्रीय नियोजन आयोगाच्या मसुदा समितीवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.

सोलापूर - येथील डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानतर्फे यंदा अकोले (जि. नगर) येथील साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांना "साहित्यसेवा' आणि खारशी (जि. भंडारा) येथील मुबारकअली सय्यद यांना "समाजसेवा' पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

रविवारी (ता. 28) सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान संकुलात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होईल. विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुखदेव थोरात यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होईल. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती प्रतिष्ठानचे सदस्य प्रा. विलास बेत यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी दत्ता गायकवाड, बाबूराव मैंदर्गीकर आणि रविकिरण पोरे उपस्थित होते. प्रत्येकी 25 हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुलकर्णी यांनी शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना शिक्षण व वंचिताच्या बाजूने विपुल लिखाण केले आहे. दुर्गम भागात भेट दिलेल्या दोनशे शाळांच्या अनुभवावर "शाळा आहे शिक्षण नाही' हे पुस्तक व परीक्षेत नापास झाल्यामुळे होत असलेल्या आत्महत्या या विषयावर देशातील तज्ज्ञ प्रयोगशील शाळा यांचे एकत्रित विचारमंथन असलेले "परीक्षेला पर्याय काय?' हे पुस्तक संपादन केले आहे. केंद्रीय नियोजन आयोगाच्या मसुदा समितीवरही त्यांनी सदस्य म्हणून काम केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heramb Kulkarni Sahityaseva Award